निरंजन डावखरे यांची प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



 

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप-रिपब्लिकन पक्ष (ए) आघाडीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण केली आहे. निरंजन डावखरे यांना मतदारांबरोबरच विविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. तर पदवीधर मतदारांबरोबरच कोकणाचा विकास या मुद्द्याला मतदारांकडून पसंती मिळत आहे.

 

 
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या कोकण पदवीधर मतदारसंघात तब्बल ५५ तालुक्यांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरीपासून सिंधुदुर्गातील दोडामार्गपर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण मतदारसंघात मतदारांशी संपर्क साधण्यासाठी निरंजन डावखरे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. भाजपचे कोकण संपर्कप्रमुख रवींद्र चव्हाण, संघटन मंत्री सतीश धोंड यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार सुरू केला. तालुक्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्याचबरोबर पदवीधरांबरोबर थेट संपर्कावर भर देण्यात आला. आगामी सहा वर्षांत बेरोजगार पदवीधर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, किनारा पर्यटन विकास, वेगवान प्रवासासाठी अंतर्गत रस्त्यांचे जाळे, मुंबईतून सागरी वाहतूक, पालघरमध्ये सागरी किनारा रस्ता, कोकण कृषी विद्यापीठाचे पालघरमध्ये केंद्र आदींना प्राधान्य देण्यात आले. आता मतदानाला शेवटचे चार दिवस शिल्लक राहिले असताना गावा-गावांत प्रत्येक मतदारापर्यंत कार्यकर्ते पोचत आहेत.

 

 
भाजपचे निरंजन डावखरे यांना कोकणातील विविध स्तरांवरील संघटनांनी थेट पाठिंबा दिला आहे. त्यात शिक्षक संघटनांबरोबर विविध सामाजिक संघटनांचा समावेश आहे. त्यामुळे डावखरेंना संघटनांच्या कार्यकर्त्यांचे जाळेही उपलब्ध झाले. स्वतंत्र कोकण विद्यापीठ,

 

 
स्थानिकांना नोकरीला प्राधान्य!

कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ, स्थानिकांना नोकरीत ७० टक्के आरक्षण, स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय, शाळांमध्ये ई-लर्निग, कोकणातील महिला-मुलींसाठी वसतीगृह आदी मुद्द्यांना पदवीधर मतदारांकडून चांगला पाठिंबा मिळाला. कोकणाच्या विकासासाठी निरंजन डावखरेंनी मांडलेले मुद्दे महत्वाचे असल्याचे मतदारांनी आवर्जून सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@