आठ दिवसांत खुला होणार नवीन बजरंग बोगदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |
 
 
जळगाव :
गणेश कॉलनीतील नवीन बजरंग बोगदा वाहतुकीसाठी येत्या आठ दिवसांत खुला करण्याचा महापालिका आणि रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. यापुढे पावसाच्या पाण्यामुळे अडथळा येऊ नये म्हणून प्रस्तावित गटारीचे काम तातडीने मार्गी लावण्यात येणार आहे.
 
 
महापालिकेने ३ कोटी ७५ लाख रुपये रेल्वे प्रशासनाकडे जमा करून नवीन बजरंग बोगद्याचे काम मार्गी लावले. एकाच बोगद्यावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा या मागील उद्देश आहे. नवीन बोगद्यापर्यंतच्या रस्त्यासाठी इच्छापूर्ती गणपती मंदिराची जागाही मोकळी करण्यात आली. पण पावसाचे पाणी नवीन बोगद्यात तुंबू लागल्याने त्यातून वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. महापालिकेच्या या नियोजनशून्य कारभावर नागरिक टीका करीत आहेत.
 
 
बुधवारी महापौर ललित कोल्हे, सभागृह नेते नितीन लढ्ढा, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसेवक संदेश भोईटे, राजू पटेल, अजय पाटील, दुर्गेश पाटील, शहर अभियंता दिलीप दाभाडे, सहायक अभियंता सुनील भोळे, आरोग्य अधिकारी उदय पाटील, अभियंता प्रसाद पुराणिक, योगेश वाणी, रेल्वेचे आरोग्य निरीक्षक जे. पी. वर्मा, मनपाचे आरोग्य निरीक्षक के. के. बडगुजर, एन. एम. साळुंखे आदींनी बोगदा परिसराची पाहणी केली.
 
 
बोगद्यातील पाण्यासाठी आऊटलेट
जुन्या व नवीन बजरंग बोगद्यातील पाण्याचे आऊटलेट मुक्ताईनगर-एसएमआयटीकडे जाणार्‍या नाल्यात सोडण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारी सकाळपर्यंत ड्रेनेज पाईप येणार असल्याची माहिती नगरसेवक संदेश भोईटे यांनी दिली. रेल्वेच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. तसेच बोगद्याच्या दोन्ही बाजूने हायमास्ट लॅम्प उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
बोगद्याजवळ तयार करणार सम्प
बोगद्याजवळ गणेश कॉलनी बाजूने एक सम्प तयार करण्यात येणार आहे. गणेश कॉलनी व परिसरातून येणारे पाणी प्रथम या सम्पमध्ये जमा होईल. तेथून ते नाल्यात सोडण्यात येणार आहे. नियोजनानुसार काम वेळेत पूर्ण झाल्यास येत्या आठ दिवसांत बोगदा वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती नितीन लढ्ढा यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@