नायरमधील एमआरआय मशीन दुरुस्तीचा प्रस्ताव चर्चेविना मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |

विरोधकांचा गदारोळ

 

 
 
मुंबई : नायर रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त एमआरआय मशीनचा प्रस्तावावर नगरसेवकांना बोलू दिले नाही त्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला परंतु चर्चेविनाच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान एमआरआए मशिनच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
 
जानेवारी महिन्यात नायर रुग्णालयातील एमआरआय मशिनमध्ये अडकून राजेश मारु या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ही मशिन बंद आहे. त्यामुळे येथील रुग्णांचे हाल होत होते. ही मशिन दुरुस्ती करून सुरु करण्याचा तब्बल दीड कोटीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीत मंजुरीसाठी आणला होता. दुरुस्तीसाठीच्या रकमेवरुन वाद रंगण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रस्ताव रेटत अध्यक्षांनी मंजूर केला. त्यामुळे विरोधकांनी गदारोळ घातला. मात्र विरोधाला न जुमानता अध्यक्षांनी दुर्लक्ष केले.
 
मुंबई महापालिकेने मे. फिलिप्स इं. लि. या कंपनीकडून ही एमआरआय मशीन ३ वर्षांच्या हमी कालावधीसह व ५ वर्षांच्या परिरक्षण कालावधीसह २००८ ला मंजुरीनुसार ७ कोटी ८९ लाख २८ हजार ८१३ रुपयांना खरेदी केली होती. २१ जानेवारी २०१७ रोजी या मशीनचा एकूण ८ वर्षांचा कालावधी संपला होता. त्यानंतर रुग्णसेवेकरीता वाढीव एक वर्षाचा परिरक्षण करार फिलिप्स कंपनीसोबत करण्यात आला होता. मात्र आणखीन पुढील १० वर्षांसाठी परिरक्षण करार करण्यापूर्वीच २८ जानेवारी रोजी ही दुर्घटना घडली व मशीन तेव्हापासून बंद पडली होती. आता रुग्णांची गरज व अडचण लक्षात घेता प्रशासनाने आता ही मशीन दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ही एमआरआय मशीन फिलिप्स कंपनीची असल्याने याच कंपनीकडून ती दुरुस्त करण्यात येणार आहे. या दुरुस्तीचा एकूण खर्च ९४, ०६,६०८ रुपये इतका असणार आहे. तसेच वार्षिक परिरक्षणाचा खर्च ५९,२७,१२८ रुपये इतका येणार आहे. असा सर्वप्रकारचा एकूण खर्च १,५३,३३,७३६ रुपये इतका येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@