नाशिकमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |




नाशिक : नाशिक शहर परिसरातील विविध शाळा, शिक्षणसंस्था, व्यायामशाळा, सामाजिक उपक्रमशील संस्था, गृहनिर्माण संस्था आदींमध्ये आज ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालय सातपूर येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला. विद्यालयाचे संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांनी योगप्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यालयाचे योग क्रीडा शिक्षक अशोक काळे यांनी शारिरिक व्यायामांचे व ध्यान स्थितीची प्रात्यक्षिके, ताडासन, वृक्षासन, वज्रासन, भुजंगासन, योगमुद्रा इत्यादी आसने सादर करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आसने केली. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष राजाराम पाटील-निगळ, प्राचार्य सुदाम आथरे, उपप्राचार्य अरुण पवार, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी योगासने केली.

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन महाविद्यालयात ‘योग दिना’निमित्त शेकडो विद्यार्थ्यांनी योगासने केली. नाशिकमधील सर्वच शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी योग जागर केला. कालच्या पावसामुळे मैदानांवर चिखल झाल्याने शाळांच्या उत्साहावर पाणी फिरले. पण, काही शाळांनी ऐनवेळी धावपळ करत नवीन ताडपत्र्यांची खरेदी करून योग दिनानिमित्त योगसाधनेचा कार्यक्रम पार पाडला.

 

सूर्यनमस्कार यज्ञ पूर्णाहुती

 

योग दिनाचे औचित्य साधून ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय योग - ध्यान साधना समिती’ माध्यमातून मागील तीन वर्षांपासून योग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी दि. ९ जूनपासून आयोजित केलेल्या शिबिराचा समारोप २१ जून, जागतिक योग दिनी सूर्यनमस्कार करून करण्यात आला. शिबिरात सूर्यनमस्कार, प्राणायाम, जलनीति शुद्धीक्रिया, शरीरसंचालन, सर्वांगासन, कपालभाती, अनुलोम - विलोम, भ्रामरी, अर्धशलभासान, कर्णप्राणायाम, महामुद्रा, तोलूंगासन, वृक्षासन, त्रिकोणासन, उर्ध्वताडासन, नौकासन अशा विविध प्रकारच्या आसनांचा अभ्यास करण्यात आला. वय वर्ष १० ते वय वर्ष ९९ अशा सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. योगगुरू अशोक देशपांडे (श्री जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळ, नागपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नागरिकांनी मिळून १२७१ सूर्यनमस्कार करून या सूर्यनमस्कार यज्ञाची पूर्णाहुती केली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विजय कदम (नाशिक शहर संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) हे उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@