देशभर मोठ्या उत्साहात आज योगदिन साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |
 

 
 
 
देशभर मोठ्या उत्साहात आज योगदिन साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी योगशिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यामध्ये नागरिकांना योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मंत्रीमहोदयांनीही योगाभ्यास करत योगाचे महत्व पटवून देत सगळ्यांनी नियमीत योगा करत आरोग्य निरोगी ठेवण्याचे संदेश दिले आहे. नागरिकांनीही या कार्यक्रमांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिल्याचाही पहायला मिळत आहे. 
 
 
केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड, दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी – 
आज असलेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी हे शाहदरा झील पार्क दिल्लीमधील योगा कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच युवकांमध्ये आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे, त्यामुळे रोज कामातून थोडा वेळ काढून किंवा कामातच व्यायामाच्या पद्धती जोडून व्यायाम कायम चालू ठेवा, असे आवाहन करत युवकांना फिट राहण्याचा संदेशही त्यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमाला युवावर्ग, महिलावर्ग तसेच वयोवृद्ध नागरिकांनी ही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. 
 
 
सुप्रसिद्ध गायक शान – 
मुंबईमधील योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉलीवूड गायक शानही सहभागी झाला होता. यावेळी योगा केल्यामुळे खूप प्रसन्न आणि एक वेगळ्या उर्जेचा अनुभव घेतल्याचा त्याने सांगितले. आताच्या पिढीला तात्काळ फरक अपेक्षित असतो, वर्कआऊटवर जास्त भर दिला जातो. पण, वर्कआऊटपेक्षा योगाने जास्त चांगला फरक जाणवल्याचा अनेकांचा अनुभव असल्याचेही त्याने सांगितले. 
 
 

जैसलमेर बीएसएफ जवान – 
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने जैसलमेरमधील बीएसएफ जवानांनी तेथील वाळवंटी भागातच योगाभ्यास करत योगाचे महत्व पटवून दिले. 
 
 
रोहतांग जवळ आयटीबीपीचे जवान-
 
१३ हजार २०० फूट उंचावर रोहतांग पासच्या जवळ आयटीबीपीच्या जवानांच्या तुकडीने योगाभ्यास केला. यावेळी बर्फाच्छादित प्रदेशात एवढ्या उंचावर योगा करून या जवानांनी एक वेगळेच उदाहरण घालून दिले आहे. तसेच यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश असल्याचे पहायला मिळत आहे. 
 
 
लद्दाखमध्ये सूर्यनमस्कार आयटीबीपी – 
रोहतांग पास प्रमाणेच लद्दाख येथीस आयटीबीपी जवानांनी देखील १८ हजार फूटांच्या उंचीवर सूर्य नमस्कार घातले आहेत. यासंदर्भातील व्हिडियो आयटीबीपी जवानांच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ बघतानाही तेथील वाहत्या हवेचा जोर किती असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहरादून -
 
 
आज देहरादून येथे ५० हजार नागरिकांसोबत प्रार्थना आणि मंत्राच्या साथीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाभ्यासाची सुरुवात केली. भारतीय वन संस्थान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून नेपाळमधील काठमांडूच्या पशुपतिनाथ मंदिरामध्येदेखील आज योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योवेळी नेपाळमधील भारतीय राजदूतांसमवेत अनेक नागरिक सहभागी झाले होते. तसेच त्यांनी श्वसनाशी संबंधीत अनेक व्यायाम प्रकार यावेळी केले. 
@@AUTHORINFO_V1@@