शालेय अभ्यासक्रमात योगाभ्यासासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |





उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे आवाहन


मुंबई : सुदृढ निरोगी राष्ट्रासाठी योग करणे आवश्यक असून शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा. राज्य शासनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे केले. ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’निमित्त येथील वांद्रे रेक्लमेशनजवळील योगा पार्क येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रीयो, खा. पूनम महाजन, आ. अ‍ॅड. आशिष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

योग ही भारताने जगाला दिलेली मौल्यवान भेट असल्याचा उल्लेख उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी यावेळी केला. तसेच यावर्षी ‘योग दिना’निमित्त ‘शांतीसाठी योग’ अशी संकल्पना आहे. सकारात्मक विचारांना चालना देण्यासाठी योगासने आवश्यक आहे. सकारात्मक विचार विकासासाठी आवश्यक असून त्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा, जेणेकरून निरोगी आणि सुदृढ राष्ट्राची निर्मिती करणे शक्य होईल. बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढले आहेत. ते योगामुळे दूर करणे सहज शक्य असल्याचे ते यावेळी म्हणाले.

गेट-वे ऑफ इंडियावर योग दिनाचा उत्साह

‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ निमित्त गेट-वे ऑफ इंडिया येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेट वे ऑफ इंडिया येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई शहर तसेच पतंजली योग समिती व मुंबई ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. अरविंद सावंत, आ. राज पुरोहित, आ. मंगलप्रभात लोढा, भारत स्वाभिमानी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश यादव, पतंजली समितीचे अध्यक्ष पोपटराव कदम, महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा मेधा चिपकर, सीआरपीएफ, सीआयएसएफचे जवान आणि अनेक संस्थांच्या मान्यवरांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी योग करून उत्साहात योग दिन साजरा केला.

@@AUTHORINFO_V1@@