महड येथील अन्नातून विषबाधा प्रकरणात पाच बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |




खोपोली : महड येथील वास्तूशांतीच्या जेवणातून विषबाधा झालेल्या प्रकरणात गुरुवारी चौथा बळी गेला. विजय शाहूराज शिंदे (११) या मुलाचा चिरायू हॉस्पिटल, पनवेल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घोषित झाले. या दुर्दैवी घटनेत महड येथील शिंदे कुटुंबातील हा तिसरा बळी गेला आहे. सोमवारी रात्री मृत्यू झालेले ऋषिकेश शिंदे (१२) व प्रगती शिंदे (१३) यांच्यावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते तर गुरुवारी याच कुटुंबातील तिसरा सदस्य दगावल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, सुखम हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ अवस्थेत उपचार सुरू असलेले गोपीनाथ नकुरे (५५) यांचाही मृत्यू झाला आहे.

@@AUTHORINFO_V1@@