दमणगंगेचे पाणी नांदगाव, येवला, चांदवड, निफाड, दिंडोरीला मिळालेच पाहिजे : खा. चव्हाण.

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खा. हरिश्चंद्र चव्हाण, कळवण आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष समीर चव्हाण यांनी राजभवनात मुंबई येथे भेट घेऊन दमणगंगेचे पाणी नांदगाव, येवला, चांदवड, निफाड, दिंडोरीला मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली.

 

दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत चालू आहे. एकदरे गांव हे माझ्या मतदारसंघातील पेठ तालुक्यातील दमणगंगा नदीवर आहे. एकदरेला लागून कादवा खोरे (पालखेड धरण समूह) आहे. त्यातील वाघाड हे धरण एकदरे धरणाच्या जवळ आहे. त्यामुळे एकदरे धरणाचे पाणी वाघाड धरणात आणणे अगदी सोयीचे आहे. त्यानंतर हे पाणी वाघाड ते करंजवण आणि नंतर करंजवण ते ओझरखेड असे प्रवाही बोगद्याद्वारे पाणी पालखेड समूहात आणता येईल. पालखेड समूहाची सिंचन क्षमता ७० हजार हेक्टर आहे. माझ्या मतदारसंघातील पालखेड धरण समूह हे तुटीचे खोरे आहे. यातील धरणे दरवर्षी भरत नाहीत.

 

सदर तूट भरून काढण्यासाठी वरीलप्रमाणे योजना केल्यास दिंडोरी, निफाड, चांदवड, नांदगांव, येवला व अवर्षणप्रवण तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. राज्यपालांनी पुढे त्वरित कारवाई करत प्रकरण पुढे पाठवत लवकरात लवकर हे प्रकरण पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले. याबरोबरच लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामे पार-तापी-नर्मदा नदी जोड योजना या राष्ट्रीय प्रकल्पाचा भाग म्हणून समावेश करावा, अशी मागणीदेखील खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली. खा. चव्हाण यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकरणावर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून नाशिक जिल्ह्याला लवकरात लवकर अनुशेष मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले.

 

निष्क्रिय सा. बां.कार्यकारी अभियंता कंकरेज यांची उचलबांगडी करा : खा.चव्हाण

 

चंद्रकांतदादा पाटील यांच्या नाशिक दौऱ्याकडे लक्ष

 

वर्षानुवर्ष नाशिक जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले निष्क्रिय सा.बां.चे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांची तात्काळ विभागातून उचलबांगडी करून सखोल चौकशी करण्याची मागणी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मंत्रालयात शिष्टमंडळासह भेट घेऊन केली. सुरेंद्र कंकरेज हे गेल्या कित्येक वर्षांपासून कळवण येथे कार्यरत असून आघाडी शासनाच्या कालावधीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठेकेदारांच्या आशीर्वादाने निष्क्रिय असतानाही कंकरेजना नेहेमी पदोन्नती मिळत गेली. कंकरेज यांची आता पुन्हा सा.बां.उत्तर विभाग (सुरगाणा) नाशिक येथे पुन्हा बदली झाली. त्यामुळे स्थानिक जनतेत निष्क्रिय कंकरेज यांच्याविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सुरेंद्र कंकरेज यांनी नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी नेमणुकीच्या कालावधीत केलेल्या कामांचे अनेक गैरप्रकार केल्याचे आरोप असून त्यांची सखोल चौकशी होऊन त्याच्याविरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्याची थेट मागणी केली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून ते या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

@@AUTHORINFO_V1@@