भुसावळ - जळगाव तिसर्‍या रेल्वे मार्गासाठी प्रथमच भिलाईतून रेल्वेचे २६४ मीटर लांब रुळ दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |

भुसावळ-भादलीदरम्यान साडेसहा किमी काम अंतिम टप्प्यात

 
भुसावळ :
भुसावळ-जळगावदरम्यान तिसर्‍या रेल्वे मार्गासाठी प्रथमच २६४ मीटर लांबीचे (सुमारे ८०० फूट) नवीन रुळ भिलाई पोलाद कारखान्यातून मागवले आहेत. यापूर्वी तात्पुरते टाकलेले ६४ ते १२८ मीटर लांबीचे जुने रुळ काढून त्यांच्याजागी नवीन रुळ टाकणे सुरू आहे.
 
 
भुसावळ ते भादलीपर्यंत पहिला, तर जळगाव ते भादली असा तिसर्‍या रेल्वे लाईनचा दुसरा टप्पा असेल. भुसावळ ते भादली या १२ किमीपैकी साडेसहा किमी अंतरातील काम अंतिम टप्प्यात आले आहे.
 
 
भुसावळ-जळगाव दरम्यान तिसर्‍या रेल्वे लाईनवरील जुने रूळ काढून त्याजागी नवीन रूळ टाकणे सुरू आहे. भुसावळपासून भादलीकडे साडेसात किमी अंतरात हे काम पूर्ण झाले. सोबतच ओव्हरहेड वायरिंग टाकण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी, मे महिन्यात भुसावळ ते भादली मार्गावर भादलीपासून इंजिन चालवून चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्याने या लाइनवरील जुने रूळ काढून नवीन रुळ टाकणे सुरू आहे. हे काम पूर्ण होताच सुरक्षा विभागातर्फे तिसर्‍या लाईनची अंतिम चाचणी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहे.
 
 
भुसावळ जंक्शनवरील प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलणार
भुसावळ - येथील जंक्शन स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे सध्याचे क्रमांक बदलले जाणार आहेत. नवीन उभारल्या जाणार्‍या प्लॅटफॉर्मला नऊ आणि दहाऐवजी एक आणि दोन असे क्रमांक दिले जातील. आगामी ऑगस्ट महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
 
 
भुसावळ स्थानकावर एकूण आठ प्लॅटफॉर्म असून त्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनचा वापर केला जात नाही. त्यावर पूर्वी मुंबई व नाशिक शटल लावली जात होती. कालांतराने या गाड्यांना जोडल्या जाणार्‍या डब्यांची संख्या वाढल्याने या प्लॅटफॉर्मचा वापर थांबवण्यात आला. रेल्वे स्थानकावरील गाड्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने नवीन दोन वाढीव प्लॅटफॉर्मचे काम हाती घेतले आहे. १५ ऑगस्टला दोन्ही नवीन प्लॅटफॉर्मचे लोकार्पण होणार आहे. याच दिवशी प्लॅटफॉर्मच्या क्रमांकात बदल होणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दोन्ही नवीन प्लॅटफॉर्मच्या कामाला रेल्वेे प्रशासनाने गती दिली आहे. नवीन प्लॅटफॉर्मच्या जागी नळांची फिटींग केली आहे, असे रेल्वेचे अभियंता रोहित थवरे यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@