दहशतवाद्यांना ठेचणे चालूच ठेवणार, लष्करप्रमुखांचा निर्धार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



काश्मिरातील राजकीय घडामोडींमुळे खंड नाही

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळणे व राज्यपाल राजवट लागू होणे, या राजकीय घडामोडींचा परिणाम भारतीय सैन्यदलाने दहशतवाद्यांविरोधात चालवलेल्या मोहिमेवर होणार नसून दहशतवाद्यांना ठेचणे सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट निर्वाळा भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला.

आमची मोहीम आम्ही केवळ रमजानच्या काळात थांबवली होती. मात्र, त्यामुळे काय झाले हे आपण पाहिलेच. जम्मू व काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यामुळे आमच्या दहशतवादविरोधी मोहिमेत काहीही खंड पडणार नसून ती आधी जशी सुरु होती तशीच पुढेही सुरू राहील. या मोहिमेत कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नसल्याचे रावत यांनी स्पष्ट केले.

सैन्यादलांतील समन्वय वाढणार

काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर आता येत्या काही दिवसांत भारतीय सैन्यदले दहशतवाद्यांविरोधात लक्ष्य-निर्धारित मोहिमा अधिक जोमाने राबवण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यामुळे राज्याचे गृहखाते, पोलीस, निमलष्करी दले, तसेच सैन्यदले आणि गुप्तचर यंत्रणा यांच्यातील समन्वय वाढू शकणार असून याचा फायदा दहशतवादविरोधी मोहिमेत होणार असल्याचे सैन्याच्या काश्मीरमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@