काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |

राष्ट्रापती रामनाथ कोविंद यांनी दिली परवानगी




श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकार पडल्यानंतर आता राज्यात राज्यपाल शासन लागू करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी याला परवानगी दिली असून राज्यामध्ये आजपासून राज्यपाल शासन लागू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या ४० वर्षांच्या कालावधीमध्ये राज्यात आज आठव्यांदा राज्यपाल शासन लागू करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल एन.एन.वोहरा यांनी सुरक्षा दलांची तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक राज्यपालांच्या कार्यालयात होणार असून राज्यातील आणि सीमेवरील सुरक्षा व्यवस्थांचा ते आढावा घेणार आहेत. तसेच सरकारमधील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची देखील त्यांनी एक बैठक बोलावली असून सरकारच्या कामांचा देखील ते आढावा घेणार आहेत.

पीडीपी पक्ष आणि मेहबूबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी योग्य ते सहकार्य करत, नसल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाने काल जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर बोलतानाच काल भाजपने राज्यात राज्यपाल शासन लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींना या घटनेचा अहवाल पाठवत, राज्यपाल शासन लागू करण्याची मागणी केली.
@@AUTHORINFO_V1@@