'आमचा पेशवाईलाही विरोध आणि त्यांच्या पगडीलाही'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |

'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करणार : प्रकाश आंबेडकर

२०१९ साठी पवार - आंबेडकर एकत्र ?


 
पुणे : आमचा नेहमीच पेशवाईला विरोध राहिला आहे आणि त्यांच्या पगडीला देखील. त्यामुळे शरद पवार यांनी फुले पगडीचा केलेला स्वीकार हा स्वागतार्ह आहे अशी प्रतिक्रिया भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते.
 
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारिप कोणासोबत जाणार, तसेच वंचितांसाठी काम करणाऱ्या संघटना आणि पक्षांच्या एकत्रीकरणाविषयी चर्चा करण्यासाठी म्हणून आंबेडकर आणि इतर नेते आज पुण्यात आले होते. यावेळी चर्चेनंतर बहुजांच्या हिताच्या दृष्टीने जो बहुजनांच्या मागणीनुसार जागा वाटप करण्यास तयार असेल त्यांच्याबरोबर सर्व पक्ष जातील असे वक्तव्य आंबडेकर यांनी केले. यावेळी त्यांना राष्ट्रवादी विषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी पवारांच्या काही मतांशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी अलीकडे घेतलेले काही निर्णय हे कौतुकास्पद जरी असले तरी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर युतीचा निर्णय घेतला जाईल, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
 
'वंचित बहुजन आघाडी' खाली सर्व बहुजन पक्ष लढणार

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आंबेडकर यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा यावेळी केली. यापुढे बहुजन समाजासाठी काम करत असलेले सर्व पक्ष हे 'वंचित बहुजन आघाडी' या बॅनरखाली लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच चर्चेअंतीच युतीचा वा आघाडीचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@