संरक्षण मंत्र्यांनी घेतली शहीद औरंगजेबच्या कुटुंबियांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |


 
पूँछ : संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शहीद जवान औरंगजेब याचा कुटुंबियांची भेट घेतली आहे. जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असलेल्या सीतारामन यांनी आज पूँछ येथे जाऊन शहीद जवानाच्या घरांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे आणि पुढेही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 
 
आज सकाळी ११ वाजता सीतारामन या पूँछ येथे पोहोचल्या होत्या. यानंतर त्यांनी शहीद जवानाच्या घरी भेट देऊन तब्बल अर्धा तास तजवानाच्या कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी शहीद औरंगजेब याचे वडील, आई, भाऊ आणि इतर नातेवाईक यावेळी उपस्थित होते. सीतारामन यांनी त्यांची कौटुंबिक विषयांवर चर्चा केली. तसेच त्यांचे सांत्वन करत भारत सरकारने हे नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.




भारतीय लष्करात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या शिपाई औरंगजेब याची गेल्या १४ तारखेला दहशतवाद्यांकडून पुलवामा येथे हत्या करण्यात आली होती. औरंगजेब हा ईदनिमित्त सुट्टी घेऊन आपल्या गावी परत आला होता. परंतु ईदच्या अगोदरच दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण करून त्याची हत्या केली होती. या घटनेमुळे देशभरातून यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी देखील औरंगजेब यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.
 
@@AUTHORINFO_V1@@