मुंबई उच्च न्यायालयाकडून झाकीर नाईक यांना दणका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाकडून आज वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक यांना मोठा दणका दिला आहे. पासपोर्ट रद्दीकरणाच्या बाबतीत कोणतेही आदेश पारित केले जावू नाही असे मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता झाकीर नाईक यांच्या समस्येत अजूनच वाढ झाली आहे. झाकीर नाईक यांना फरार घोषित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मागेच दिले होते. 
 
 
 
याआधी झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची बँक खाती गोठवण्यात आली होती. तसेच त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते. झाकीर नाईकच्या मुंबईतील १० कार्यालयांवर मुंबई पोलीस आणि एनआयए यांनी संयुक्तपणे कारवाई करत छापे टाकले होते. झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेवर काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 
 
 
धर्मोपदेशाच्या नावाखाली धर्मांतर तसेच युवकांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहित करणारी भाषणे आणि देशविघातक कृत्यांमध्ये झाकीरचा समावेश या गोष्टींमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. नाईक वर लागलेल्या आरोपांनंतर मागील वर्षी त्याने भारतातून पलायन केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@