नैतिक मूल्यांना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविणार : महेंद्र काबरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



मूल्यशिक्षण अभ्यासक्रमाचे २५ जून रोजी अनावरण

शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार

मुंबई : “मुलांना आज शिक्षणासोबतच संस्काराचीही गरज आहे. नैतिक मूल्यांच्या माध्यमातून संस्कार घडतात त्यामुळे नैतिक मूल्यांना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविणार,” अशी माहिती ‘हेमा फाऊंडेशन’चे प्रबंध विश्वस्त महेंद्र काबरा यांनी दिली. मूल्यशिक्षण अभ्यासक्रमबाबत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी ‘हेमा फाऊंडेशन’च्या विश्वस्त आणि क्रिएटिव्ह हेड अनिता माहेश्वरी, ‘हेमा फाऊंडेशन’चे प्रसिद्धीप्रमुख प्रकाश जाखोटिया आदी मान्यवर उपस्थित होते. ‘हेमा फाऊंडेशन’ने विद्यालयांसाठी ४ वर्षांचा मूल्यशिक्षण अभ्यासक्रम तयार केला आहे, त्याचे अनावरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दि. २५ जून रोजी सायंकाळी ५ .४५ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. यावेळी मूल्यशिक्षणावर आधारित ३२ लघुपटांचे आणि ‘हेम दिशा’ या शिक्षक मार्गदर्शिकेचेही अनावरण केले जाणार आहे.

या अभ्यासक्रमाबाबत बोलताना काबरा म्हणाले की, “मूल्य हा शिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे. विद्यालयांमध्ये मूल्यशिक्षणाचे धडे दिल्यास शिक्षित आणि आणि संस्कारित विद्यार्थी घडतील. त्यासाठी नैतिक मूल्यांना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविणार आहे. मूल्यशिक्षणाबाबत अभ्यासक्रम राबविण्यासाठी सोलापूर विद्यापीठाने परवानगी दिली आहे. तसेच पुणे विद्यापीठाशी याबाबत चर्चा सुरु आहे. हा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. संजय मालपानी, मानसशास्त्रज्ञ चिनू अग्रवाल, संशोधक डॉ. नागपाल सिंह, बाल मानसोपचारतज्ञ डॉ. हरीश शेट्टी, लेखक शिव खेरा आदींचे मार्गदर्शन घेतले आहे, ``नैतिक मूल्यांवर आधारित ३२ विषयांचा या अभ्यास क्रमात समावेश केला आहे. एका वर्षाच्या अभ्यासक्रमात ८ विषय असणार आहेत,”

“शाळेमध्ये आठवड्यातून एकदा मूल्य शिक्षणाचा तास असतो, परंतु बर्‍याचदा काही शिक्षक आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करतात. मूल्यशिक्षणाच्या वेळेला मूल्य शिक्षणाचेच धडे दिले गेले पाहिजेत,” असे अनिता माहेश्वरी म्हणाल्या. “१९ राज्यांतील १०६ शहरे आणि ७ हजार विद्यालयांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे,” असे त्या म्हणाल्या.

हेमा फाउंडेशनचे पुस्तक साहित्य आणि स्पर्धेसंबंधी माहिती विद्यार्थ्यांना जलदगतीने मिळण्यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. ‘हेमा फाउंडेशन’, ‘रॅम रत्न ग्रुप’ कडून सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामधून मुलांना त्यांच्या संवेदनशील आयुष्यात संस्कार आणि मूल्यशिक्षणाचे धडे देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जागरूक नागरिक होण्यासाठी मुलांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव करून देणे हा ‘हेमा फाउंडेशन’चा उद्देश आहे.

@@AUTHORINFO_V1@@