राहूल गांधींसमोरील अडचणीत वाढ, वाकडी प्रकरणी पुण्यातही तक्रार दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |
 

 
 
 
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या दोन मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड करून त्या मुलांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष राम सातपुते यांनी पुण्यातील डेक्कन पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली आहे.
 
 
गेल्या काही दिवसांपासून जामनेर तालुक्यातील वाकडी गावातील एका विहिरीत पोहायला गेलेल्या नग्न मुलांना मारहाण केल्याचे प्रकरण देशभर गाजत आहे. या घटनेवर सर्वच राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आपल्या सोशल मिडियावरून घडल्या प्रकाराचा निषेध करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र तसे करताना त्यांनी सोशल मिडियावर या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ प्रकाशित केला त्यामुळे ते आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
 
 
 
दरम्यान या संपूर्ण प्रकरणा संदर्भात बाल हक्क कायद्यानुसार हे पिडित मुलांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यामुळे बाल हक्क आयोगाने राहूल गांधी यांना नोटीस बजावली आहे. बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा २०१२ नुसार या आरोपींवर गुन्हा दाखल केलेला असतानाही अशा प्रकारचा कुठलाही व्हिडीओ अथवा फोटो प्रसारित करणे गुन्हा असल्याचे बाल हक्क आयोगाने आपल्या नोटशीत म्हटले आहे.
 
 
पुण्यात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीमुळे आता राहूल गांधी यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राहूल यांनी आपल्या सोशल मिडियावरून तो व्हिडिओ तातडीने काढून टाकावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. काँग्रेसकडून मात्र या संपूर्ण प्रकरणाची कोणतीही गंभीर दखल घेतली गेलेली नसून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून मग निर्णय घेऊ असे जुजबी उत्तर दिले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@