डीएसकेंच्या गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा होणार लिलाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |

 
पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांच्याकडे थकलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी आता संबंधित बँकांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. डीएसकेंना कर्ज दिलेल्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या कर्जवसुलीसाठी म्हणून डीएसकेंच्या 'डीएसके विश्व' या प्रकल्पातील गहाण असलेली मालमत्ता लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासाठीची नोंदणी देखील बँकेकडून सुरु करण्यात आली आहे.

डीएसकेंकडे बँक ऑफ महाराष्ट्राचे ३१ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी आहे. हे कर्ज घेतेवेळी त्यांनी बँकेकडे धायरीतील 'डीएसके विश्व' प्रकल्पातील काही वस्तू तारण ठेवल्या होत्या. परंतु कर्जबाकी देण्यामध्ये डीएसके अपयशी झाल्यानतर बँकेने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकेने २१ तारखेपर्यंत नागरिकांना लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची विनंती केली आहे. तसेच २३ तारखेला हा लिलाव करण्यात येईल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@