गाडया वेळेवर धावण्याचे प्रमाण ८५ टक्के

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |

रेल्वेची गतीशिल प्रगतीकडे वाटचाल

* २०१९ पर्यंत सर्व प्रवाशी गाडयांच्या डब्यांचे शौचालय हे बायो शौचालय
* भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकांवर एलईडी दिवे लावून कोटयावधी रु.ची वीज बचत
*  मोबाईल ऍपवरुन साधारण तिकिट उपलब्ध करण्याची सुध्दा व्यवस्था
* अमरावती , बडनेरा येथे रेल्वेडबे दुरुस्तीचा कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोकळा
रेल्वेची गतीशिल प्रगतीकडे वाटचाल
भुसावळ, २० जून :
रेल्वेने गतीशिल प्रगतीकडे वाटचाल सुरु केली आहे. शिघ्र निर्णय आणि त्वरित अंमलबजावणी ही नवीन ओळख रेल्वे प्रशासनाची बनली आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वेला आधुनिक करण्याचे यशस्वी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अमरावती / बडनेरा येथे रेल्वे डबे दुरुस्ती फॅक्टरी सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यात काही तांत्रिक अडचणी होत्या परंतु रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत अधिकार्‍यांंची बैठक होवून ही अडचण दुर करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच येथे डबे दुरुस्तीचा कारखाना सुरु होणार आहे.
 
 
१५ जून रोजी रेल्वे मंत्र्यांनी सिकंदराबाद येथे कामगार संघटनांच्या बैठकीला संबोधीत केले. यात रेल्वेच्या जलद आणि अतिजलद गाडया वेळेवर धावण्याचे प्रमाण ७५ टक्के झाले असून हे वाढण्यासाठी सामुहिक प्रयत्न केले जावे, असे मार्गदर्शन केले होते. फलस्वरुप १६ जून रोजी रेल्वे गाडया वेळेवर धावण्याचे प्रमाण ८५ टक्के झाले आहे. स्वच्छ भारत अभियानात रेल्वे प्रशासन सहभागी असून रेल्वे स्थानक व परिसर स्वच्छ राहण्यासाठी विविध उपक्रम रेल्वेतर्फे राबविले जात आहे.
 
 
गेल्या वर्षी लांबपल्ल्याच्या गाड्यांंमध्ये बायो शौचालय ही संकल्पना राबविण्यात आली. त्याचे चांगले परिणाम आल्याने २०१९ पर्यंत सर्व प्रवाशी गाडयांच्या डब्यांचे शौचालय हे बायो शौचालय बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
रेल्वे प्रशासनाने यापूर्वी भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकांवर एलईडी दिवे लावून कोटयावधी रुपयांची वीज बचत केली आहे. तसेच अनेक स्थानकांवर सौरउर्जा प्रकल्प राबविले आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मोबाईल ऍपवरुन साधारण तिकिट उपलब्ध करण्याची सुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे. अमरावती / बडनेरा येथे रेल्वे डबे दुरुस्तीचा कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने भुसावळ विभाग अधिक विस्तारीत होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@