विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करता येणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



शिक्षणमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई: अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, दि. १० ऑगस्टपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली असून जात पडताळणी समितीकडे ठरवलेल्या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन तावडे यांनी केले आहे.

अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, बी. फार्म आणि आर्किटेक्ट अशा अभ्यासक्रमांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या संभ्रमाच्या वातावरणात विद्यार्थ्यांना आपले वर्ष वाया जाण्याची भीती वाटत होती, परंतु शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गाला दिलासा मिळणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@