लाचखोर घरतची रवानगी ठाणे कारागृहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



 

डोंबिवली: लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याची अखेर बुधवारी ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली. घरत याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र तब्येत बिघडल्याचे कारण पुढे करत तो पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज होणार असल्याने त्याची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे.

दि. १३ जून रोजी घरत व त्याच्या साथीदारांना आठ लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. या अटकेनंतर मंगळवारी कोठडीची मुदत संपल्याने तिघांना पुन्हा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने या तिघांना २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी संजय घरत यांच्या वकिलांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यावर बुधवारी सुनावणी होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, आधारवाडी कारागृहात जाण्याऐवजी छातीत दुखत असल्याचे कारण पुढे करीत घरत पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यासह त्याचे दोन सहकारीही तब्येत बिघडल्याचे कारण सांगून रुग्णालयात दाखल झाले होते. बुधवारी घरतच्या जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत गुरुवारी यावर निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@