‘योग दिना’निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



नाशिक : ‘जागतिक योग दिना’निमित्त शहरातील मनपा शाळा, जिल्हा परिषद शाळा, विविध शिक्षणसंस्था, सामाजिक संस्था यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरू युवा केंद्राच्यावतीने चौथ्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’निमित्त २१ जून रोजी सकाळी ७ ते १० या कालावधीत गंगापूर रोड येथील समाजकार्य महाविद्यालयात युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. विलास देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात जिल्ह्यातील गाव पातळीवरील व तालुका पातळीवरील सर्व नेहरू युवा केंद्राशी संलग्नित युवा, महिला, क्रीडा मंडळे, व्यायामशाळा व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी तसेच योग विद्या गुरुकुलचे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असून योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. युवक-युवतींनी योग दिन कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वय भगवान गवई यांनी कळविले आहे.

 

जि प.शाळांमध्ये कार्यक्रम

 

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात येणार असून याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. गेल्या तीन वर्षांपासून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याबाबत प्राथमिक शाळांमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करून विद्यार्थी, पालक, नागरिक व ग्रामस्थ यांच्यामध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधत प्रत्येक शाळेमध्ये योगासनांचे प्रात्यक्षिक, प्राणायाम, आदि बाबत तसेच नागरिकांचा सहभाग घेऊन ’योग दिन’ साजरा करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@