डीएसके प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांची चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |

कर्जवाटप केल्याप्रकरणी बँकेच्या तीन अधिकाऱ्यांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी



पुणे : डी.एस. कुलकर्णी यांना कर्जवाटप केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन बड्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या तिन्ही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असून यामध्ये कसल्याही प्रकारचा गैरप्रकार समोर असल्यास या तिघांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
 
बँकेचे माजी अध्यक्ष राहिलेले रविंद्र मराठे तसेच दोन बडे अधिकारी पद्माकर देशपांडे आणि आर.के.गुप्ता या तिघांना सध्या पोलिसांनी चौकशीसाठी पुणे पोलीसांनी बोलावलेले आहे. यामध्ये डी.एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला बँकेकडून देण्यात आलेल्या कर्जाविषयी आणि कर्जवाटपाच्या वेळी बँकेने नेमके कोणते नियम पाळले होते. याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. दरम्यान यामध्ये कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास या तिघांवर देखील थेट कारवाई करण्यात येणार आहे.

 
दरम्यान या तिघांबरोबरच कुलकर्णी यांचे सुपुत्र शिरीष कुलकर्णी यांना देखील पुणे पोलिसांनी आज चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयाने कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज ते चौकशीसाठी म्हणून पोलिसांना शरण आले आहेत. दरम्यान शिरीष यांना देखील अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@