बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी रवींद्र मराठे यांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



 

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक तसेच बँकांचे कर्ज थकवल्याप्रकरणी सध्या तुरुंगवास भोगत असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आपल्या अधिकारांचा गैरवापर करून नियमबाह्य कर्ज दिल्याच्या आरोपाखाली पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता यांच्यासह इतर चार जणांना अटक केली. राज्यातील आर्थिक वर्तुळात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता यांच्यासह डी. एस. कुलकर्णींचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे, अभियंता विभागातील अधिकारी राजीव नेवासेकर यांनाही आर्थिक गुन्हे शाखेनं पुण्यातून अटक केली. याखेरीज बँक ऑफ महाराष्ट्रचेच माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांनाही जयपूरमधून तर बँकेचे अधिकारी नित्यानंद देशपांडे यांना अहमदाबादमधून अटक करण्यात आली. बँकेच्या या अधिकार्‍यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून डीएसकेंना बेकायदेशीररित्या कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे.

@@AUTHORINFO_V1@@