संजीवन योगोपचारातून समृद्ध जीवनाकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |




योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरिरस्यच वैद्यकेन ।

योगाकरोत् तं प्रवर मुनीना पतंजलि प्रांजलिरानतोसी ॥

 

या पतंजलीच्या योगसूत्रानुसार ॠषीमुनींच्या काळापासून गुरुशिष्य परंपरेतून योगशास्त्र २१ व्या शतकात पोहोचले आहे. या प्राचीन शास्त्रात काळानुरूप अनेक बदल झाले आणि आधुनिक राहणीमानानुसार बदलही घडत गेले परंतु योगाशास्त्रामुळे ‘संकल्पना’ अबाधित राहिली. योग म्हणजे मन, बुद्धी व शरीराची साम्य अवस्था होय. पुरातन काळामध्ये निर्माण झालेल्या योगशास्त्राच्या हठयोग, राजयोग, भक्तियोग, कर्मयोग ज्ञानयोग इ. शाखा प्रचलित आहेत. या योगाशास्त्राचा प्रचार आणि प्रसार अनेक राजगुरूंनी जागतिक स्तरावर केलेला आहे. याचा परिणाम म्हणून दि. २१ जून २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून दि. २१ जून हा ’जागतिक योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. या योगदिनाच्या निमित्ताने योग शास्त्राकडे उपचार म्हणून कसे पाहिले पाहिजे आणि योग शास्त्रामध्ये सहजीकरण आणि नाविन्य किती झालेले आहे, हे प्रस्तुत लेखातून जाणून घेऊ.

 

प्राचीन काळापासून हठयोग आणि राजयोग हे प्रचलित आहेत पण आधुनिक जीवनशैलीत संजीवन योगाची गरज निर्माण झाली. कबीरबाग, पुणे येथील आचार्य डॉ. वि. करंदीकर हे या संजीवन योगाचे जनक आहेत. हे स्वतः एमबीबीएस आहेत. अनुभवी डॉ. करंदीकर शारीरिक व्यंग किंवा व्याधी निव्वळ औषधोपचाराने किंवा चालणे एवढ्यानेच बरे होत नाहीत, हे जाणतात. यावर आणखी काहीतरी उपाय शोधावा हा विचार मनात ठेवून त्यांनी प्रथमच योगाशास्त्राकडे उपचार पद्धती म्हणून पाहिले. दीर्घकाळ अभ्यास करून योगशास्त्र हे एक उत्तम उपचारपद्धती आहे, हे त्यांनी सिद्ध केले. ज्यांना कोणतीही व्याधी नाही, असे लोक हठयोगाचा अभ्यास विनासायास करू शकतात परंतु, व्याधीग्रस्तांना काही मर्यादा आहेत. हठयोगातील आसन सहजीकरण असा विचार मधल्या काळात कोणी केला नाही. २१ व्या शतकात डॉक्टरांच्या मनात असा विचार आला व हठयोगाचे सहजीकरण करून त्या आसनाची उपयुक्तता पूर्ण करायला विविध साहित्यांचा वापर करणे हा अतिशय आधुनिक विचार पुढे रूजला आणि यातूनच संजीवन योगोपचारांची निर्मिती झाली.

 

डॉ. करंदीकर यांनी कोणत्या व्याधीवर कोणते व्यायाम करावे यावर सखोल अभ्यास करून योगोपचाराची मांडणी केली. व्याधीग्रस्त शरीर पारंपरिक आसने करू शकणार नाही म्हणून विविध साहित्य संजीवन योगोपचारात डॉ. करंदीकर यांनी वापरले. यात विशिष्ट प्रकाराचे रोप, बेल्ट, खुर्ची, लोड, उशी, चादर यांचा वापर केल्याने व्याधीग्रस्ताला आधार तर मिळतो व सुखकारक वाटते. अस्थि-स्नायूंचा गैरवापर झाल्याने किंवा चुकीचे उभे राहिल्याने किंवा खूप काळ एकाच स्थितीत बसल्याने, चुकीच्या तऱ्हेने दैनंदिन कामे केल्याने किंवा हाडांची झीज झाल्यामुळे मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी इ. व्याधी उत्पन्न होतात. या व्याधींवर उपचार म्हणून निरनिराळे अनेक व्यायाम प्रकार दिले जातात. त्याचबरोबर संजीवन योगोपचारामध्ये दैनंदिन जीवनात विहारातील चुकांचे निरसन केले जाते. शरीराचा रचनात्मक बिघाड स्नायूंच्या अकार्यक्षमतेमुळे होतो. त्यामुळे विशिष्ट व्यायाम प्रकारात विशिष्ट स्नायूंना योग्य प्रकारे आणि आवश्यक तेवढाच ताण देणे, तसेच विशिष्ट स्नायूंना कार्यान्वित करणे यासाठी योग्य प्रकारे व्यायाम करणे आवश्यक असते. तसेच शरीरातील झालेला रचनात्मक बिघाड पाहण्यासाठी एक्स-रे रिपोर्ट पाहूनच संजीवन योगोपचारामध्ये व्यायाम दिले जातात. त्यामुळे हे व्यायाम प्रकार जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्तींकडे जाऊन केले जावेत; अन्यथा दुखणे वाढूही शकते. व्याधी ही आरोग्यातील प्रमुख समस्या आहे. व्याधी आरोग्याच्या हानीचे द़ृश्य स्वरूप असते. त्यामुळे व्याधीचे निवारण करण्यास लागणारा कालावधी वेगवेगळा असू शकतो.

 

मी स्वतः कबीरबाग (पुणे) येथे संजीवन योगोपचाराचे शिक्षण घेतले असून मुंबईमध्ये (2 वर्षे) योगोपचार दिले आहेत. आत्तापर्यंत मी विविध व्याधींवर अनेक रुग्णांना उपचार देऊन आरोग्य संपादन करून दिले आहे आणि आता नाशिकमध्ये कबीरबाग संजीवन योग पद्धतीद्वारे मणक्याचे विकार, गुडघेदुखी, मानदुखी, मधुमेह, हृदयविकार, संधीवात सायटिक, पोटाचे विकार, महिलांचे आजार, जनरल फिटनेस इ. व्याधींवर उपचार देत आहे. संजीवन योग उपचार पद्धतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच व्याधीमुक्तीसाठी 9819028711 या क्रमांकावर संपर्क साधून व्याधीमुक्तीचा आनंद उपभोगू शकता. शेवटी सर्वे भवंतु सुखीन्ः सर्वेसंतु निरामयः । हेच आपले उद्दिष्ट आहे.

@@AUTHORINFO_V1@@