कानंदी नदीवरील धरणास १३१३ कोटींची प्रशासकीय मान्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



मुंबई : पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील कानंदी नदीवर गुंजवणी प्रकल्पांतर्गत धरण बांधण्यात येत आहे. याद्वारे २१ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रास बंद नलिकेद्वारे सिंचन लाभ देण्यासाठी या प्रकल्पाला १३१३.७३ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता बुधवारी देण्यात आली. या प्रकल्पास १६ सप्टेंबर १९९३ मध्ये ८६.७७ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने प्रकल्पास ३ सप्टेंबर २००२ मध्ये ३१६.६० कोटी इतकी प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. बांधकामादरम्यान दरसूचीतील बदल, व्याप्तीतील बदल, भूसंपादनाच्या किमतीतील वाढ, संकल्पचित्रातील बदल व अनुषंगिक खर्चाच्या वाढीमुळे प्रकल्प किमतीत वाढ झाली असल्याने आता त्यासाठी द्वितीय सुधारानुसार १३१३.७३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यापैकी प्रत्यक्ष कामासाठी ११८४.९७ कोटी व उर्वरित कामांसाठी १२८.७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@