जागतिक सायकल दिवसाचे ३ जूनला दिल्ली येथे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
दिल्ली : शारीरिक आणि मानसिक दृष्टीने आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टर नेहमीच सायकल चालवा असा सल्ला देत असतात याचे महत्व जाणून दिल्ली येथील 'कनॉट प्लेस'वर उद्या जागतिक सायकल दिवस साजरा करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र यांच्या तर्फे ३ जूनला सायकल दिवस साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधत उद्या भारतात पहिल्यांदा जागतिक सायकल दिवस साजरा केला जाणार आहे. 
 
 
 
या दिवसानिमित्त दिल्ली महानगरपालिकेकडून एका सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तसेच यावेळी एका स्मार्ट सायकल स्थानकाचे यावेळी ते उद्घाटन करणार आहेत. यामुळे कमी दरात सायकल उपलब्ध होवू शकेल तसेच पर्यावरणाच्या निमित्ताने हे सोयीचे ठरणार आहे. 
 
 
 
वाढत्या पेट्रोलच्या किंमती तसेच वाढणारे प्रदूषण यांचा विचार करता भविष्यात सायकलचा प्रवास अधिक सोयीस्कर ठरणार आहे. तसेच नागरिकांना बैठकीचे काम असल्याने त्यांचा व्यायाम होत नाही आणि सायकलचा वापर केला तर व्यायाम आणि शरीर चांगले होण्यास मदत मिळेल असा उद्देश यामागे सरकारचा आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@