तळोद्यातील नेमसुशिल शैक्षणिक समूहाला आय.एस.ओ मानांकन प्राप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2018
Total Views |
 
तळोदा :
तळोदा शहरातील शैक्षणिक क्षेत्रांत विशेष कामगिरी करत विशेष ठसा उमटविणार्‍या नेमसुशिल शैक्षणिक समूहाला आपल्या सुयोग्य व्यवस्थापणाबद्दल अतिशय प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय.एस.ओ (ISO) मानांकन प्राप्त झाले.
 
 
स्पर्धात्मक विद्यार्थी घडविण्याबरोबरच त्यांच्या शारीरिक व मानसिक विकास करणे व त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान न देता त्यास सर्वंकष शिक्षण व प्रात्याक्षिक द्वारे स्पर्धात्मक बनविणे यासाठी नेमसुशिल शैक्षणिक समूह सदैव प्रयत्नशील असतो.
 
 
आंतरराष्ट्रीय नामांकन मिळावे यासाठी यासाठी शाळेने तयारी केली त्यात शाळेचे व्यवस्थापन, विद्यार्थी घडविण्यासाठी शाळेने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची शारीरिक प्रगती, त्यांना शिक्षणाप्रति आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांची हजेरी, नियमितपणा व शैक्षणिक प्रगती, वार्षिक निकाल, त्याचप्रमाणे शिक्षकांची विद्यार्थी घडविण्याची आस्था, मेहनत, शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त समाजोपयोगी राबविलेले उपक्रम, दप्तर व्यवस्थापन, पर्यावरण जागरूकता, तसेच संगणक शिक्षण, संस्कार व त्यासाठी असणार्‍या सर्व सोई, सुविधा व व्यवस्थापन करत या बाबींची काटेकोर परीक्षण करण्यात आले.
 
 
त्याचबरोबर शाळेचे व्यवस्थापन, लेखे, विद्यार्थ्यांची माहिती, विद्यार्थी-पालक-शाळा यांचा समन्वय संपर्क, परीक्षेचे नियोजन, उत्तरपत्रिका तपासणी पद्धत इ. बाबींचे परीक्षण करून नेमसुशिल समूहास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय.एस.ओ मानांकन मिळाल्याचे संस्थेचे अध्यक्ष निखिल तुरखीया यांनी सांगितले.
 
 
शाळेला मान्यांकन मिळावे यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष महाले आप्पा, सचिव संजयभाई पटेल, संचालिका सौ.सोना तुरखीया, मुख्याध्यापिका पुष्पा बागुल, मुख्या. भावना डोंगरे, इंग्रनी मेडियमचे प्राचार्य प्रशांत शिंपी, लिपिक नितीन भामरे, गुमानसिंग पाडवी तसेच विशेष परिश्रम समाधान मराठे, ईश्वर चित्रकथे, ललिता पाडवी, दीपा पाडवी आदींनी घेतले.
@@AUTHORINFO_V1@@