अडचणीच्या काळातील 'सोनेरी' सोबती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2018
Total Views |
 
भारतीय संस्कृतीमध्ये सोनं खरेदीला अनन्य साधारण महत्व आहे. सोनं खरेदीमागे अनेक कारणं आहेत. काही लोक गुतंवणूक करण्याच्या हेतूने सोनं खरेदी करत असतात तर काहीजण सोन्याच्या दरामध्ये नेहमी होणाऱ्या चढउत्ताराचा परताव्याच्या दृष्टीने फायदा घेऊ इच्छितात. मागील पाच वर्षांमध्ये तुलना करता सोन्यामध्ये २० टक्के एवढी भाव वाढ झाली आहे. सोन्याचा झपाट्याने वाढणारा दर बघता सोने खरेदीसाठी कोणतेही ठोस कारण भारतीयांना लागत नाही, हे तर निश्चित पटते. सोने खरेदीमध्ये प्रत्येक भारतीयांच्या भावना जडलेल्या असतात, भारतीयांमध्ये सोनं हे एक असे माध्यम आहे जे नात्यानात्यांमध्ये जवळीक निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य करते. अनेकजण असे म्हणतात की भारतीय हे सोन्यासाठी वेडे आहेत. हे विधान पूर्णपणे चुकीचे नाही किंबहुना बऱ्याच अंशी बरोबर आहे. आपण सोने खरेदी ही अनेक विशेष कारणासाठी करतो जसे की शुभकार्य, वाढदिवस, एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी त्याचप्रमाणे, हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे धनतेरस, दसरा, अक्षय तृतीया इ. अशा अनेक पवित्र तिथींना सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
 
या सगळ्याखेरीज सोन्याला आपल्या कडे आणखी एका कारणामुळे अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते म्हणजे सोनं हे एक असं माध्यम आहे जे रोखीमध्ये त्वरित रुपांतरीत करता येवू शकते. एखाद्या अडचणीच्या किंवा अत्यावश्यक काळामध्ये (उदा. शैक्षणिक गरजा, घरगुती कारण, वैद्यकीय खर्चासाठी इ.) जेव्हा पैशांची अत्यंत निकड भासते त्यावेळेस सोनं आपला चांगला मित्र म्हणून काम करू शकते. आपल्याला जेव्हा आर्थिक मदतीची अत्यंत गरज असते त्यावेळेस आपल्याकडे असलेले सोने हे आपली मदत करू शकते. आपण गेल्या अनेक दशकांपासून हिंदी-मराठी चित्रपटातून पाहात आलो आहोत. की एखाद्या कुटुंबात आर्थिक अडचण आली तर त्या कुटुंबातील स्त्री लगेच पुढे होऊन आपल्या अंगावरचे सोने गहाण ठेवण्यास पुढाकार घेते. हा त्या चित्रपटातील मेलोड्रामा असला तरी काही अंशी हे आपल्या समाजातील वास्तव आहे. आणि त्यामुळेच सोन्याला उद्देशून लिहिलेला ''अडचणीच्या काळातील 'सोनेरी' सोबती!'' हा मथळा अगदी समर्पक वाटतो. सामान्य पगारदार व्यक्तीला वैयक्तिक (PERSONAL) कर्ज, व्यावसायिक कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. सामान्य माणसांना अशा अडचणींचा सामना करता यावा यासाठीच विविध बँकांनी 'सोनेतारण कर्ज योजना' सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत तुमच्याकडे असलेले सोने तुम्ही बँकेत तारण म्हणून ठेवून त्याबदल्यात त्वरित कर्जमंजुरी मिळवू शकता. सोनेतारण कर्जाचे महत्वाचे वैशिट्य म्हणजे तुम्हाला ठराविक कालावधीमध्ये कर्ज रक्कम भरण्याची किवा मुदतपूर्व बंद करण्याची मुभा देते. सोनेतारण कर्ज बंद केल्यानंतर तुम्ही तुमचे तारण म्हणून ठेवलेली सोन्याची जिन्नस परत मिळवू शकता.
 
आज बँकिंग क्षेत्रात जवळपास बहुतांश बँकामध्ये ही योजना उपलब्ध आहे. राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच सहकारी बँकाही यात मागे नाहीत. ग्राहकांचा या योजनेप्रती वाढणारा प्रतिसाद किंवा त्यांची गरज बघून जनसेवा सहकारी बँकेतही बऱ्याच कालावधी पासून ही योजना सुरु आहे. जनसेवा बँक आपल्याला अत्यंत अल्प कालावधी आणि अल्प दारामध्ये सोने तारण कर्ज मंजूर करून देते व खऱ्या अर्थाने “जनसामान्यांची असामान्य बँक” हे आपले ब्रीदवाक्य सार्थ करते! जनसेवा बँकेच्या सोनेतारण कर्ज योजनेची वैशिट्य खालीलप्रमाणे.
 
 

कर्ज योजनेचे शीर्षक

सोने तारण कर्ज योजना

कर्ज पात्रता

व्यक्ती (फर्म, कंपनी यांना लागू नाही.)

कर्जाचे कारण

वैयक्तिक कारणासाठी

मार्जिन

30%

कर्ज कालावधी

12 महिने

परतफेड मुदत

रु.2.00 लाखांपर्यंत व्याजासहित बुलेट पेमेंट व त्यापुढील कर्जासाठी दरमहा EMI.

 
 
या कर्ज योजानेचा लाभ घेण्यासाठी जनसेवा बँकेच्या आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा.
 
(Marketing Initiative for Janseva bank)
 
 
@@AUTHORINFO_V1@@