डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन १२ जूनला भेट घेणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
सिंगापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांची भेट १२ जूनलाच होणार अशी माहिती सध्या मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही बैठक १२ जूनलाच होणार असल्याची घोषणा केली आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्पकडून ही बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र आता ही बैठक १२ जूनलाच होणार असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. १२ जून या दिवशी हे दोन्ही नेते सिंगापूर येथे एका बैठकीत भेट घेणार होते. 
 
 
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याकडून ही भेट रद्द केली होती. मात्र आता पुन्हा एकदा ही भेट होणार असे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. या दोन्ही देशांमध्ये अणु विषयावरून तणाव सुरु असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी ही बैठक रद्द केली आहे असे म्हटले जात होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून किम जोंग उन तणावपूर्ण वक्तव्य करीत असल्यामुळे देखील ही बैठक रद्द करण्यात आली असे म्हटले जात होते. 
 
 
 
गेल्या दोन वर्षांपासून अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. तसेच दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्या दिल्या होत्या, तर अमेरिकेने कोरियन सागरामध्ये आपल्या युद्ध नौका देखील सज्ज केल्या होत्या. त्यामुळे यावर शांततेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यावा अशी जगाची इच्छा आहे. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून दोन्ही नेते भेट घेवून यावर उपाय करणार आहेत. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@