आयसीआयसीआय बँककडून चंदा कोचर यांची हकालपट्टी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

संदीप बक्षी यांची नवे संचालक आणि सीओओ म्हणून नियुक्ती




मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज वाटपाप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बँकेच्या संचालिका चंदा कोचर यांना आज बँकेच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आले आहे. कोचर यांच्या जागी संदीप बक्षी यांची बँकेचे नवे संचालक आणि सीओओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बँकेकडून कोचर यांना काही दिवसांच्या सुट्टीवर देखील पाठवण्यात आले आहे. त्यामुळे कोचर यांची बँकेकडून हकालपट्टी करण्यात आली आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.|


आयसीआयसीआय बँकेकडून याविषयी नुकतीच घोषणा केली असून यासंबंधी बँकेने एक परिपत्रक देखील जारी केले आहे. ज्यामध्ये कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याचा उल्लेख बँकेने यामध्ये केला आहे. कोचर यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना बँकेच्या सर्व पदांवरून दूर करण्यात येत आहे, तसेच संदीप बक्षी हे यापुढे बँकेचे सर्व व्यवहार पाहतील, असे देखील यात म्हटले आहे. तसेच चौकशी पूर्ण झाल्यानंतर मात्र कोचर पुन्हा एकदा आपल्या कामावर रुजू होतील, असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे.

वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला दिलेल्या कर्जामध्ये चंदा कोचर आणि यांच्या पतीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला होता. बँकेचे शेअर होल्डर असलेले अरविंद गुप्ता यांनी याविषयी लेखी तक्रार केली होती. ज्यामध्ये त्यांनी धूत यांना आयसीआयसीआय बँकेडून देण्यात आलेल्या कर्जानंतर धूत आणि कोचर यांचे पती दीपक कोचर यांनी मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावाची कंपनी सुरु केली होती. यामध्ये कोचर यांच्या पतीला ५० टक्के वाटा देण्यात आला होता. यावरूनच कोचर यांची तक्रार करत त्यांच्या चौकशीची मागणी केली जात होती.
@@AUTHORINFO_V1@@