किम जोंग उन करणार चीनचा दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |


प्याँगयांग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केल्यानंतर उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन हा चीनच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून नुकतीच याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आली असून आज दुपारनंतर किम चीनच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

दरम्यान दक्षिण कोरियाकडून देखील या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. चीन आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत. यासाठी म्हणून किम यांचा हा दौरा होणार आहे, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. तसेच अमेरिकेबरोबर उत्तर कोरियाने चर्चा करावी म्हणून चीनने अनेक प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीची देखील या दौऱ्याला पार्श्वभूमीवर असणार आहे, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दक्षिण कोरियामध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेनंतर किम जोंग उन याने चीनचा एक अधिकृत दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये किम आणि चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चर्चा झाली होती. त्यानंतर उत्तर कोरियाचे दक्षिण कोरिया आणि अमेरिकेबरोबर असलेल्या संबंधांमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. त्यामुळे यामध्ये चीनचा मोठा वाटा मानला जात आहे. त्यामुळे किम यांचा हा दौरा अकस्मात जरी असला तरी त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत काही जण व्यक्त करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@