शिरीष कुलकर्णीला शरण येण्यासाठी एक आठवड्याची मुदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |



पुणे :
गुंतवणूकदरांचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याचा अटकपूर्व जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कुलकर्णी यांच्या याचिकेवर सुनावणी करत हा निर्णय दिला असून कुलकर्णी यांना पोलिसांना शरण येण्यासाठी म्हणून एक आठवड्याची मुदत न्यायालयाने दिली आहे.


डी.एस.कुलकर्णींच्या अटकेनंतर कुलकर्णी यांच्याशी संबंधित अनेकांना पोलिसांनी अटक केली असून या सर्वांची चौकशी केली जात आहे. यामध्ये कुलकर्णी यांच्या पुत्राला देखील अटक करण्यात येणार होती. परंतु अटकेपूर्वीच शिरीष कुलकर्णीने सर्वोच्च न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने यावर सुनावणी करताना हा अर्ज फेटाळून लावला. तसेच पोलिसांना शरण येण्यासाठी म्हणून एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@