ऐनपूर येथे ̒ शोले ' स्टाईल आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

 
 
 
 
ऐनपूर येथे   ̒ शोले ' स्टाईल आंदोलन
 
रावेर , 19 जून
ऐनपूर गावात पुनवर्सनची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा, सुवर्ण महोत्सव योजनेची शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या  खात्यावर जमा करा आदी मागण्यांसाठी पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन जैतकर यांनी तेथील पाण्याच्या नवीन उंच टाकीवर चढून   ̒ शोले ̕ स्टाईल आंदोलन केले. या संदर्भात लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
 
 
वारंवार विनंती करुनसुध्दा पुनर्वसनाची कामे होत नसल्याने मंगळवारी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची माहिती प्रशासनाला कळताच भुसावळ येथील पुनर्वसन विभागाचे उपअधिकारी भुजबळ यांनी गावात येऊन त्यांनी आंदोलकांची समजूत घातली. एक महिन्याच्या आत मंजूर सर्व कामे करण्याचे लेखी आश्वासन ही त्यांनी दिले. गटशिक्षण अधिकारी विजय पवार यांनी शिष्यवृत्ती संदर्भात आणि वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता अजय शर्मा यांनी विजेसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
 
 
या आंदोलनात पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन जैतकर, श्रीराम महाजन , कृष्णा जैतकर, सुभाष जैतकर , ज्ञानेश्वर महाजन, रवींद्र कुंभार, रंजना जैतकर, छाया जैतकर, विनोद भिल, पंकज कोळी आदी सहभागी होते. आंदोलन वेळी निंभोरा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
@@AUTHORINFO_V1@@