नाशिक, पुणे येथील कंपन्या करणार प्लास्टिकचे विघटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

पालिकेची कंपन्यांनशी चर्चा

 
  
 
 
मुंबई : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. मुंबईत येत्या २३ जूनपासून प्लास्टिक बंदीच्या ठोस अमंलबजावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये दुकानदारांसह ग्राहकांकडून आढळून आलेले प्लास्टिक जप्त करण्यात येणार आहे. या जमा होणाऱ्या प्लास्टिकच्या विघटनाचे काम नाशिक, पुणे येथील दिले जाणार आहे. या कंपन्यांशी पालिकेने चर्चा केली असून लवकरच या कंपनींना कामे दिली जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंबंधीच्या सूचना राज्यातील विविध महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना, २०१८ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेने ठोस उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या संकलन केंद्रामध्ये जमा झालेल्या या कचऱ्याचे विघटन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबई प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांना हे काम दिले जाणार आहे. त्यानुसार नाशिक, पुणे येथील दोन कंपन्यांनी पालिकेकडे संपर्क साधला असून त्यांची ई निविदाद्वारे निवड केली जाणार आहे.
 
दरम्यान, किलो कचऱ्यामागे पालिकेला किती रुपये मिळणार हे येत्या निश्चित झाले नसून येत्या दोन दिवसांत याबाब निर्णय घेतला जाईल, असे पालिका उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी सांगितले. येत्या २३ जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी दहा हजार रुपयापर्यंत दंड आकारण्यात येणार होता. ग्राहक किंवा दुकानदारांकडे प्लास्टिक आढळून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन ते जमा केले जाणार आहेत. पालिकेने सर्वसामान्य ग्राहकांची दंडाची रक्कम २०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका विधी समितीकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला असून समितीने या प्रस्तावाला हिरवा कंदिल दिल्यास दोनशे रुपये दंड आकारला जाईल. अन्यथा पाच हजार दंड पालिकेला वसूल करावाच लागेल, अशी ठाम भूमिका प्रशासनाने घेतली आहे
 
संकलन केंद्रामध्ये १.४२ लाख किलो प्लास्टिक जमा
 
मुंबईत ६८ ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे पालिकेने कार्यान्वित केले आहेत. येथे आतापर्यंत १.४२ लाख किलो प्लास्टिक जमा झाले असून वांद्रेमध्ये सर्वाधिक ३०,४६० किलो प्लॅस्टीक जमा झाले आहे. यात प्लास्टिक पिशव्या, प्लेट, कप, काच आणि कटोऱ्यांचा समावेश आहे.
 
प्लास्टिक प्रदर्शन
 
वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे कचरा संकलनासाठी पालिकेने २२ जून ते २४ जूनदरम्यान प्लास्टिक पर्यायी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनात स्टॉल्समध्ये प्लॅस्टिकचे पर्याय, प्लॅस्टिक रिसायकल आणि बॉटल क्रशर्स असणार आहेत. विस्तारित उत्पादकांच्या जबाबदारी अंतर्गत खाजगी कंपन्यांना हे कळविण्यात येणार असून प्लास्टिकच्या विलीनीकरणास कशी मदत होईल, हे समजून सांगण्यात येईल. स्टॉल उभारण्यास इच्छुक कंपन्यांनी ८२९१६५२९९ वर संपर्क साधावा किंवा [email protected] येथे मेल करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@