मेहबूबा मुफ्ती यांनी आदरानं पद सोडणं नाही तर हाकलून देणं पसंत केलं : ओमर अब्दुल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

 
 
काश्मीर :  आज जम्मू काश्मीर येथे आज राजकीय भूकंप आल्याने सर्व समीकरणे बदलली आहेत. भारतीय जनता पक्षाने पीडीपीला दिलेले आपले समर्थन काढून घेतल्यानंतर आज ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजप सोबतच मेहबूबा मुफ्ती यांच्यावर देखील ताशेरे ओढले आहेत. "मेहबूबा मुफ्ती यांना मी गेले अनेक दिवस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास सांगत होतो, ३ वर्षांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवले आता त्यांनी हे पद रिक्त केले पाहिजे असे मी त्यांना सुचवत होतो, मात्र त्यांनी माझे ऐकले नाही. त्यांना आदराने पद सोडणे मान्य नव्हते मात्र त्यांनी हाकलून देणं पसंत केलं." अशा शब्दात त्यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्यावर टीका केली.
 
 
 
 
 
भारतीय जनतापक्ष देखील तितकाच जबाबदार :

काश्मीर येथे खराब होत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपलं समर्थन काढलं, मात्र त्यासाठी ते देखील तितकेच जबाबदार आहेत, असेही अब्दुल्ला यावेळी म्हणाले. तसेच भारतीय जनता पक्षाने पीडीपीला विश्वासात घ्यायला हवे होते, मगच निर्णय घ्यायला पाहिजे होता, असेही ते यावेळी म्हणाले.
 
मी भीक मागायला जाणार नाही :

यावेळी माध्यमांनी त्यांना "दुसऱ्या कुठल्या पक्षाचे समर्थन घेणार का?" असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की, "मी समर्थनासाठी कुठेही भीक मागायला जाणार नाही. ज्या पक्षांना मी नकोय त्यांच्यापुढे मी हात पसरणार नाही." मी सत्ता स्थापन करण्यासाठी आतुर झालेलो नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@