राष्ट्वादी कॉंग्रेस किसान सेलचे जळगावात केळीफेक आंदोलन !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

आंदोलकांपेक्षा पोलिसांचीच संख्या अधिक

 
* आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केले माल्यार्पण
* महिला कार्यकर्त्यांची अल्प संख्या, कार्यकर्त्यांचा दुष्काळ
* ट्रॅक्टरने केळी आणून फेकली रस्त्यावर
* महाजनांच्या कार्यालयातही केळी फेकण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न
* नागरिक, पोलिसांना मिळाला केळीचा प्रसाद!

जळगाव, १९ जून :
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव जिल्हा किसान सेल व पदाधिकार्‍यांनी मंगळवारी दुपारी जळगाव येथे जलसंपदामंत्री यांच्या कार्यालयासमोर केळीफेक आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक होती. आंदोलनापूर्वी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. दरम्यान एक ट्रॅक्टर भरुन केळी ना. महाजनांच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर टाकण्यात आली. नंतर कार्यकर्त्यांनी हीच केळी फेकून आंदोलन केले. पोलीस, नागरिक आणि काही पत्रकारांना आंदोलकांनी फेकलेल्या केळीचा मार बसला.
 
ना. गिरिश महाजन यांनी शेतकर्‍यांना दिलेले आश्‍वासन १५ दिवस होवूनही पूर्ण झाले नाही. शेजारी मध्यप्रदेश राज्य असून तेथे सुध्दा भाजपाचे सरकार आहे. तेथील मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीबद्दल प्रत्येक शेतकर्‍याला लाखो रुपये नुकसानभरपाई दिली परंतु, महाराष्ट्रात  मिळालेली नाही. म्हणून हे आंदोलन राष्ट्रवादीतर्फे करण्यात आले. पोलिसांना चुकवून दोन महिलांनी ना. महाजन यांच्या कार्यालयाच्या आवारात केळी फेकली.
 
राष्ट.वादी कॉंग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी त्यांच्या मनोगतात येत्या ८ दिवसात शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. शंकर अण्णा धोंडगे, माजी आ. अरुण पाटील, ऍड. रविंद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँक संचालक संजय पवार, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, प्रतिभा शिरसाठ, माया बारी, मिनल पाटील, मंगला पाटील आदी सहभागी होते.
  
पोलीस, आंदोलकांची बाचाबाची
पोलीस प्रशासनाने कोर्ट चौकात केळीफेक आंदोलनाची परवानगी दिली होती. परंतु ना. महाजन यांच्या कार्यालयात केळी फेकण्यास मज्जाव केला होता. आंदोलन सुरु होण्यापूर्वी ना. महाजनांच्या कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर ट्रॅक्टरव्दारे केळी आणून टाकण्यात आली. आंदोलकांनी ही केळी उचलून फेकण्यास सुरुवात केली. केळी फेकतांना पोलीस, नागरिक आणि काही पत्रकारांना  लागली .   आदोलकांना तुम्ही फेकत असलेली केळी नागरिकांना लागत असल्याचे सांगितले. पण आंदोलकांनी ऐकले न ऐकल्याचे करुन केळीचे घड फेकायला सुरूवात केली. यावरुन आंदोलक व पोलिसांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यानंतर आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे मोर्चा वळविला.चौकात आंदोलकांनी रस्त्यात ठिय्या मांडला. एसडीपीओ सचिन सांगळे यांनी येवून आंदोलकांना रस्त्याच्या बाजुला व्हा असे सांगितले येथे आंदोलक व पोलीसांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. नंतर आंदोलन स्थळावरुन आंदोलकांचे शिष्ट मंडळ विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्याना  देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना झाले.
 
पोलीसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
हे आंदोलन कुणाच्या तरी सांगण्यावरुन पोलीसांनी दडपून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्वादीचे पदाधिकारी व आंदोलकांनी केला. कोणतिही अप्रिय घटना होवू नये म्हणूल जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पो.नि. गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे पो.नि.कुंभार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 
आंदोलकांनी केली केळीफेक
ना. गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर केळीफेक आंदोलन केले गेले. आंदोलनात पण या आंदोलनात कार्यकर्त्यांचा दुष्काळ दिसून आला. त्यामुळे कार्यकर्ते कमी व जिल्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारीच बहुसंख्येने सहभागी होते. आंदोलनात केवळ ५ महिला पदाधिकारी दिसून आल्या. सर्व आंदोलक मिळून ५० च्या आतच संख्या होती. केळी फेक आंदोलनानंतर रस्त्याने जाणार्‍या नागरिकांनी केळीचे घड घरी घेवून जाणे पसंत केले.
@@AUTHORINFO_V1@@