भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांची पत्रपरिषदेत माहिती

जळगाव :
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एकाच महिन्यात दोनवेळा अंमली पदार्थांची वाहने पकडली आहेत. त्यावरुन अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. अमळनेरात हा धंदा राजाश्रयामुळे राजरोसपणे सुरु आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी अवैध धंदे चालकांकडून हप्ते घेत पोलीस प्रशासनावर दबाव टाकून अवैध धंद्यासाठी रान मोकळे केले आहे. या गुन्ह्यातून एका व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी आणि अंमली पदार्थांचा धंदा करण्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये घेतल्याचा आरोप जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी पत्रपरिषदेत केला. सोमवारी रा.कॉं.च्या कार्यालयात पत्रपरिषद आयोजित करुन पत्रकारांना संभाषणाची अधिकृत क्लिप दाखवत माहिती दिली. यावेळी रा.कॉं.चे प्रवक्ता नवाब मलिक, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, गफ्फार मलिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे पक्षाचा आणि पदाचा दुरुपयोग करीत आहेत. अंमली पदार्थांचे धंदे करणारे तसेच त्यांना आशीर्वाद देणारे वाघ यांच्याविरुध्द तत्काळ नार्कोटीक्स कायद्यान्वये कारवाई करणे गरजेचे आहे.
 
 
राजकीय द्वेषातून आरोप उदय वाघ यांचा पलटवार
भाजपात राहिल्यावरही जनतेने अनिल पाटील यांना वारंवार निवडणुकांमध्ये नाकारले आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन माझ्यावर राजकीय द्वेषापोटी आरोप करीत आहे. अंमली पदार्थांच्या गुन्ह्यातील आरोपींवर यापूर्वीच अनेक स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. अशा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम रा.कॉं.करीत आहे. अमळनेरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये म्हणून हस्तक्षेप करुन स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. तयार केलेली क्लिप ही बनावट असून त्यांची संबंधित विभागाकडून कसून चौकशी करणे गरजेचे आहे. नुसते बिनबुडाचे आणि खोटे आरोप करुन त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यामुळे हा निव्वळ राजकीय द्वेष आहे, असेच म्हणावे लागेल.
@@AUTHORINFO_V1@@