आपत्कालीन कक्षाचा आयुक्तांनी केला पंचनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |



आपत्कालीन कक्ष होणार स्थलांतरीत

डोंबिवली, : पावसाळ्यात येणार्‍या संकटावर मात करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने आपत्कालीन कक्ष तयार केले आहे . या आपत्कालीन कक्षाची अवस्था बिकट असल्याने या कक्षाचा पंचनामा सोमवारी आयुक्त गोविंद बोडके यांनी केला. या धर्तीवर त्वरित कारवाई करत हे आपत्कालीन कक्ष पूर्वेतील विभाग कार्यलयाचा जुन्या ग्रंथालयात स्थलांतरित होणार आहे.

कडोंमपाने दि. १५ मे ते दि. १५ ऑक्टोबर या पावसाळच्या काळात कडोंमपा हद्दीतील १० प्रभागासाठी आपत्कालीन कक्ष स्थापन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी एकूण ७ अधिकारी आणि १९ कामगाराची नेमणुक करण्यात आली आहे. एकूण तीन पाळीत अधिकारी व कामगारांची विभागणी करण्यात आली असून प्रत्येक पाळीत दोन अधिकारी व सहा कामगार तैनात ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी कक्षातील परीस्थिती अतिशय वाईट आहे. कक्षातील वायरलेस यंत्रणा पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. या कक्षात दोरी, कोयते, फावडे, कुदळ, आदी हत्यारे असली तरी निरुपयोगी ठरली आहेत विशेष म्हणजे जे कामगार आहेत त्यातील तीन कामगार रुग्णावस्थेतील असल्याने प्रथम त्यांचीच काळजी इतर कामगारांना घ्यावी लागत आहे. यावेळी त्यांच्या बरोबर ग प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत ,फ प्रभाग क्षेत्र अधिकारी अमित पंडित ,ह प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखडे उपस्थित होते. यावेळेस आयुक्तांनी वायरलेस यंत्रणा, दूरध्वनी, कर्मचार्‍यांचे हजेरी बुक तपासले तसेच या ठिकाणी सुसज्ज असे आपत्कालीन कक्ष उभारूण्याचे आश्वासन दिले होते त्यांच्या या आश्वासनानुसार ही कारवाई करण्यात येणार असून विभागीय कार्यलयाचा जुन्या ग्रंथालया जागी हे आपत्कालीन कक्ष स्थलांतरित करण्यात येणार आहे .

@@AUTHORINFO_V1@@