आदेश बांदेकरांना गणपती पावला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |




मुंबई: मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे.

 
 

आदेश बांदेकर यांची गेल्या वर्षी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदासाठी बांदेकर यांचे नाव सुचवले होते. गेल्या वर्षी २४ जुलै रोजी त्यांची या पदी निवड करण्यात आली असून ते ३  वर्षे श्री सिद्धीविनायक न्यासाच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कार्यरत राहणार आहेत. त्यातच आता सोमवार दि. १८ जुन रोजी राज्याच्या विधी व न्याय विभागाने परिपत्रक काढून बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिल्याची माहिती दिली आहे. बादेकर हे सध्या शिवसनेनेच्या सचिवपदी देखील कार्यरत आहेत. बांदेकर हे गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेद्वारे राजकारणात सक्रीय झाले आहेत. अभिनय क्षेत्रातून आपल्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात केलेल्या आदेश बांदेकरांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला. दादरमधून मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्याविरोधात आदेश बांदेकरांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची मातोश्रीची जवळीक वाढत चालली असून त्यांच्याकडे कमी कालावधीतच अनेक मोठमोठ्या जबाबदा-याही सोपवण्यात आल्या आहेत. दरम्यान, आपल्याला राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याबद्दल आपल्याला आनंद झाला असल्याची भावना दै. मुंबई तरूण भारतशी बोलताना व्यक्त केली.

@@AUTHORINFO_V1@@