मुंबईत ७०७ इमारती अतिधोकादायक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |



इमारती रिकाम्या करण्यास रहिवाशांची टाळाटाळ

मुंबई: मुंबईत पावसाळ्यात अनेकदा धोकादायक इमारती पडून दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे ५३३ खासगी व महापालिकेच्या १७४ इमारती अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. तसेच संबंधितांना नोटीस दिली आहे, परंतु पालिकेने नोटीस देऊनही अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यास रहिवाशी टाळाटाळ करत आहेत.

पावसाळा सुरू झाला आहे. यंदा अशा इमारत दुर्घटना घडू नये तसेच लोकांच्या जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. मुंबईत ३० वर्षे पूर्ण झालेल्या आणि आयुर्मान संपलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. यंदा अतिधोकायक 'सी-1’ श्रेणीमध्ये असलेल्या ५३३ खासगी व महापालिकेच्या १७४ इमारती असून त्या कधीही कोसळतील, अशा स्थितीत आहेत. त्या सर्व इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा पालिकेने संबंधितांना दिल्या आहेत, तर १५६ खासगी इमारती पाडण्यास स्थगिती मिळाली आहे. मात्र, उर्वरित इमारती आजही उभ्या असून या इमारतींत रहिवाशी वास्तव्य करत आहेत. नियमानुसार पोलीस बळाचा वापर करून रहिवाशांना स्थलांतरित करण्यात येते, परंतु खासगी इमारतींमधील रहिवाशी घरे सोडण्यास नकार देत असल्याने अतिधोकादायक इमारतींचा पेच पालिकेसमोर निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या १७४ इमारती धोकादायक ठरल्या आहेत. त्यापैकी ११५ इमारतींचे वीज, पाणीपुरवठा खंडित केला आहे. तांत्रिक बाबींमध्ये ३९ इमारती अडकलेल्या आहेत. पालिकेच्या इमारतींची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, खासगी इमारतींना वारंवार नोटीस बजावूनही रहिवाशी रिकाम्या करत नाहीत. त्यामुळे खासगी इमारतींमध्ये दुर्घटना झाल्यास ही जबाबदारी कोण घेणार?, असा प्रश्न पालिका अधिकार्‍यांना पडला आहे.

@@AUTHORINFO_V1@@