सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनीस प्रतिष्ठेची ‘केव्हीपीआय’ शिष्यवृत्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |
 

 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील बायोइन्फॉरमॅटिक्स व बायोटेक्नॉलॉजी विभागामधील (आयबीबी) वनिता अभिजित मुळे या विद्यार्थिनीस या वर्षीची प्रतिष्ठेची केव्हीपीआय (किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना) शिष्यवृत्ती मिळाली आहे. आयबीबीमध्ये द्वितीय वर्षात शिकत असलेल्या वनिताने ही शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत ५१ वे स्थान मिळविले आहे. विद्यापीठ व आयबीबीसाठी वनिताचे हे यश अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.
 
"किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना" (केव्हीपीवाय)
 
विज्ञान क्षेत्रातील संशोधनास उत्तेजन देण्यासाठी १९९९ मध्ये सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी (डीएसटी), भारत सरकारकडून ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. संशोधनामध्ये कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या प्रतिभावान आणि प्रेरित विद्यार्थ्यांना ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देणे व देशातील संशोधन आणि विकासासाठी सर्वोत्तम वैज्ञानिक प्रतिभांची निर्मिती करणे, हे ध्येय या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आले आहे. निवडलेल्या केव्हीपीवाय फेलोला पूर्व पीएच.डी. पर्यंत व पाच वर्षांपर्यंत (जे आधी असेल ते) उदार फेलोशिप आणि आकस्मिकता अनुदान दिले जाते. याशिवाय, केव्हीपीवाय फेलोसाठी देशातील प्रतिष्ठित संशोधन व शैक्षणिक संस्थांमध्ये उन्हाळी शिबिरे आयोजित केली जातात.
 
या पार्श्वभूमीवर "केव्हीपीआय फेलोशिप मिळाल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. या शिष्यवृत्तीमुळे विज्ञान क्षेत्रातील संशोधन करण्यचा माझा उत्साह वाढला आहे,” अशी प्रतिक्रिया वनिताने व्यक्त केली.
 
@@AUTHORINFO_V1@@