निरव मोदीकडे सहा पारपत्र !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |


मुंबई : पीएनबी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या निरव मोदीकडे एकूण सहा पारपत्र (पासपोर्ट) असल्याचा खुलासा तपास यंत्रणेनी केला आहे. खरे तर एकापेक्षा अधिक पारपत्र जवळ बाळगणे हा कायद्याने गुन्हा असून यासाठी मोदीवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या या सहा पारपत्रांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर भारत सरकारने निरव मोदीचे पारपत्र रद्द करण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाला दिले होते. त्यानुसार परराष्ट्र मंत्रालयाने मोदीचे पारपत्र रद्द केले होते. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी मोदी हा ब्रिटेनमध्ये असल्याचे वृत्त बाहेर आले होते. यानंतर भारत सरकारने यावर पुन्हा एका कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी तपास यंत्रणेला मोदीकडे आणखी सहा पारपत्र असल्याची माहिती मिळाली. यानंतर तत्काळ याविषयी अधिक माहिती गोळा करून मोदीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या सहा पारपत्रांची देखील परवानगी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@