भारत-चीन आणि पाकिस्तान यांनी एकत्र यावे : चीनी राजदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |


नवी दिल्ली : भारत-चीन आणि पाकिस्तान या तिन्ही देशांनी एकत्र येऊन एक त्रिपक्षीय बैठक घ्यावी, असे आवाहन चीनचे भारतातील राजदूत लुओ झाओहुई यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वुहान भेटीनंतर भारत आणि चीन यांच्या संबंधांमध्ये अधिक सुधारणा कशी घडवली जाऊ शकते ?  यावर आयोजित करण्यात आलेल्या सत्रात आज ते बोलत होते.


'आशिया खंडामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी म्हणून भारत-चीन आणि पाकिस्तान या तिन्ही देशांनी एकत्र आले पाहिजे. गेल्यावर्षी डोकलाममध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण आशिया खंडामध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये, म्हणून आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे,' असे झाओहुई यांनी यावेळी म्हटले.




तसेच या भेटीसाठी दाखला म्हणून यांनी रशिया-मंगोलिया आणि चीनच्या झालेल्या एका परिषदेचा देखील दाखला दिला. 'परस्पर सहकार्य आणि शांततेसाठी हे तीन देश जर एकत्र येऊ शकतात. तर भारत-चीन आणि पाकिस्तान हे का एकत्र येऊ शकत नाही ?' असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. याचबरोबर भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये होत असलेल्या विकासाचे अनेक मुद्दे त्यांनी यावेळी मांडले. 
@@AUTHORINFO_V1@@