व्होडाफोन-आयडिया विलिनीकरणावर आज शिक्कामोर्तब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |

नव्या कंपनीचे भागभांडवल राहणार २३ अब्ज डॉलर्स, बाजार वाटा होणार ३५ टक्के
मोफत कॉल्स ऑफर्सच्या जीवघेण्या स्पर्धेतील कंपन्यांना मिळणार दिलासा

टीसीएसचा शेअर्स पुनर्खरेदीचा प्रस्ताव
१० हजार ९३० बिंदूंच्या वरच निफ्टी येणार तेजीत

 
 
व्होडाफोन व आयडिया या दोन दूरसंचार कंपन्यांच्या ऐतिहासिक विलिनीकरणावर सोमवारी १८ जून रोजी अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केले जाणार आहे. नव्या कंपनीचे नाव ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’ असे राहणार असून केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे या प्रस्तावित विलिनीकरणास आज मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. विलिनीकरणानंतर ही नवी कंपनी देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी (भांडवल २३ अब्ज डॉलर्स किंवा सुमारे दीड लाख कोटी रुपये असलेली) बनणार आहे.
तसेच या कंपनीचा बाजारा तील वाटा ३५ टक्क्यांपर्यंत वाढणार असून सुमारे ४३ कोटी ग्राहक राहणार आहेत. विलिनी करणामुळे या दोन्ही वाढत्या कर्जाच्या भाराखाली दबलेल्या व मोफत कॉल्सच्या अनेक ऑफर्समुळे प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागणार्‍या या दोन्ही कंपन्यांना दिलासाही मिळणार आहे. मोफत कॉल्समुळे या कंपन्यांचे मार्जिन प्रमाणाबाहेर घटत असून त्याचा परिणाम त्यांच्या नफ्यावरही होत आहे.
 
 
आयडियाकडून बँक हमी व व्होडाफोनचे दायित्व (लायबिलिटीज) स्वीकारीत असल्याचे लेखी संमतीपत्र सादर केल्यानंतर हे विलिनीकरण नोंदविले जाणार(ऑन रेकॉर्ड) जाणार आहे. ही बँक गॅरंटी २१०० कोटी रुपयांची असून ती वन टाईम स्पेक्ट्रम फीसह इतर अनेक न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित राहणार आहे. याबरोबरच आयडिया व व्होडाफोन यांना न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांची देणी भागविण्याविषयक संमतीपत्र ही सादर करावे लागणार आहे.
 
 
विलिनीकरणानंतर येत्या २६ जून रोजी होणार्‍या आपल्या विशेष बैठकीत आयडियाला आपले नाव व्होडाफोन-आयडिया लि. असे बदलण्याचा ठराव मंजूर करवून घ्यावा लागणार आहे. तसेच या संयुक्त कंपनीचे ४.१ टक्के शेअर्स व्होडाफोनकडे तर २६ टक्के समभाग कुमारमंगलम बिर्ला यांच्या आदित्य बिर्ला गु्रपकडे तर आयडियाकडे उर्वरित २८.९ टक्के शेअर्स राहतील. बिर्ला हे या विलिनीकृत कंपनीचे नामधारी चेअरमन तर बलेश शर्मा हे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व आयडियाचे प्रमुख वित्तीय अधिकारी अक्षय मुंद्रा हे सीएफओ म्हणून नव्या कंपनीचे वित्तीय व्यवहार प्रमुखपदी असतील. आयडिया सेल्युलरचे सध्याचे उपव्यवस्थापकीय संचालक असलेले अमरीष जैन हे नवे प्रमुख संचालन अधिकारी राहतील.
 
 
भारताची सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस)ने १६ हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची पुनर्खरेदी(बायबॅक) केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. ही पुनर्खरेदी कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या सुमारे दोन टक्के (प्रति शेअरमागे २१ रुपये) इतकी होणार आहे. ही पुनर्खरेदी या आर्थिक वर्षाच्या मध्यापर्यंत पूर्ण केली जाणार आहे. याआधी गेल्या वर्षीदेखील कंपनीने आपल्या एकूण भागभांडवलाच्या तीन टक्के म्हणजे १६ हजार कोटी रुपयांचेच शेअर्स २८५० रुपये दराने पुनखरेदी केेले होते.
 
 
आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टीसीएसने आपल्या सर्व समभागधारकांना लाभांशाच्या रुपात ४ अब्ज १० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. तसेच तिच्याकडे गेल्या ३१ मार्च रोजी ७ अब्ज ५१ कोटी रुपये इतकी रोख रक्कम तिच्या नोंदणीपुस्तकात होती.
 
 
गेल्या चारही आठवड्यात तेजीत राहिलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १० हजार ९३० बिंदूंच्या वर बंद झाल्यानंतरच आपली तेजीची पुढील वाटचाल सुरु करण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. १० हजार ९३० बिंदूंच्या खालीच राहिलेल्या निफ्टीत घसरण होऊ शकते असे तज्ञांचे मत आहे. सध्या तरी तो १० हजार ८०० बिंदूंच्या आसपासच रेंगाळत आहे.
 
 
निफ्टी गेल्या महिन्यातील १० हजार ४१७ बिंदूंच्या नीचांकापासून उसळी घेत १० हजार ८५० बिंदूंच्या पलीकडे जाऊन आलेला आहे. आता त्याने १० हजार ९३० बिंदूंची पातळी गाठण्यात यश मिळविले तर तो पुढे जाऊन आपला ११ हजार १७१ बिंदूंचा सार्वकालिक विक्रमही मोडण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. तसे झाल्यास या वर्षाअखेर निफ्टी १२ हजार बिंदूंपर्यंतही उसळी घेऊ शकतो. तसेच बँक निफ्टीही २६ हजार १५० बिंदूंच्या खाली सतत बंद झाला तर त्यातही घसरण होऊ शकते. या पातळीच्या वर राहिला तर मात्र तो २७ हजार बिंदूंची पातळी गाठू शकतो असे तज्ञांचे मत आहेे.
 
भारताच्या विदेश व्यापार तुटीत वाढ
भारताच्या विदेश व्यापार तुटीत गेल्या चार महिन्यातील सर्वात मोठी वाढ (१४.६२ अब्ज डॉलर्स) मे महिन्यात झालेली आहे. याचे कारण म्हणजे आयातीत झालेली १५ टक्क्यांची वाढ होय. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मेमध्ये देशाच्या निर्यातीत २८.१८ टक्क्यांनी वाढ होऊन ती २८.८६ अब्ज डॉलर्स इतकी तर आयात १४.८५ टक्कयांनी वाढून ती ४३.४८ अब्ज डॉलर्स इतकी झाली होती. मे २०१७ च्या १३.८४ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत मे २०१८ मध्ये १४.६२ डॉलर्सनी विदेशी व्यापार तूट वाढलेली आहे. कच्च्या खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीतील वाढ ध्यानात घेता त्याची आयात ४९.४६ टक्क्यांनी वाढून ती ११.५ अब्ज डॉलर्स एवढी झालेली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@