त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विश्वस्त मुलाखती पुढे ढकलल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |




नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी आज १८ जूनला सकाळी ११ वाजता मुलाखती होणार होत्या. मात्र, आता त्या २६ जूनपर्यंत पुढे ढकलल्याची नोटीस नाशिक विभागाचे सह-धर्मादाय आयुक्त प्र. भि. घुगे यांनी ऐनवेळी जारी केली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कारभारात पारदर्शकता यावी, देवस्थानचा जलद विकास व्हावा यासह विश्वस्तांची संख्या ९ वरून १३ करावी. त्यात त्र्यंबकेश्वर बाहेरच्या व्यक्तींनाही स्थान असावे, महिलांना ५० टक्के आरक्षण विश्वस्तांमध्ये असावे याशिवाय ट्रस्टवर जिल्हा न्यायाधीशांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करावी, या प्रमुख मागण्यांसह येथील कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

 

याचिका क्रमांक ४५०/२०१८ व १५६५२/२०१८ यांची आज सकाळी सुनावणी होती. त्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे मुद्दे ग्राह्य धरत न्यायालयाने यासंदर्भात महाराष्ट्र शासन, धर्मादाय आयुक्त, मुंबई, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यामुळे आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या विश्वस्तपदाच्या मुलाखती आता २६ जून रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार असल्याची नोटीस सह-धर्मादाय आयुक्तांनी तातडीने जारी केली. परिणामी आज सकाळी मुलाखतीसाठी आलेल्या ११३ जणांना मुलाखतीविनाच माघारी जाण्याची वेळ आली, अशी माहिती याचिकाकर्त्या ललिता शिंदे यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@