पावसाळ्यात खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महापालिका प्रशासनात उपाययोजना करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |



भिवंडी,: भिवंडी शहर परिसरात निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे खड्डे पडलेले आहेत. विविध कामांसाठी खोदण्यात येणारे रस्ते व्यवस्थित बुजविले जात नाहीत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने लहानमोठे वाहनचालक, पादचारी अपघातग्रस्त बनतात. यासाठी महापालिका प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशा सूचना खा. कपिल पाटील यांनी महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांना दिल्या आहेत. पूरपरिस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेने अधिक सतर्क राहायला हवे, त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्यातून निघणारे डेब्रिज, रेती-मातीचे ढिगारे बांधकाम करणारे जवळ टाकतात. याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देऊन बांधकामापासून निघणार्‍या टाकाऊ मटेरियलची तातडीने विल्हेवाट लावण्यात यावी. मॅनहोल व गटारांवरील झाकणे युद्धपातळीवर दुरुस्त करून ती बसविली जावीत, तसेच उघड्या नाल्यांवर आच्छादने टाकली जावीत. स्वच्छतेच्या प्रश्‍नावर आरोग्य विभाग कमकुवत ठरताना दिसत आहे. त्याचा सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यामध्ये झालेला आहे. स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याची काळजी महापालिका प्रशासनाने तातडीने घ्यावी, अशा सूचना खा. कपिल पाटील यांनी केलेल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@