ससूनमधील परिचारिकांचा संप मागे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |


पुणे : परिचारिकांच्या बदल्यांच्या निषेधार्थ पुणे ससून रुग्णालयातील परिचारिकांनी पुकारेला बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालय प्रशासनाने परिचारिकांच्या बदल्यांविषयी तोडगा काढण्यासंबंधी दिलेल्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. परंतु प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा स्टायपंडचा तोडगा न निघाल्यामुळे डॉक्टरांचा संप मात्र अजून सुरुच आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयातील दहा परिचारिकांची बदली प्रशासनाकडून करण्यात आली होती. यावेळी परिचारिकांच्या संघटनेकडून यावर आक्षेप घेत फक्त वरिष्ठांच्या आकासापोटी रुग्णालयातील परिचारिकांची बदली करण्यात येत असल्याचा आरोप संघटनेच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी केला होता. तसेच या बदल्या रद्द करण्यासाठी म्हणून आजपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता. परंतु अगोदरच प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेल्यामुळे रूग्णाचे हाल होऊ नये, म्हणून प्रशासनाने या बदल्या रद्द करण्यासंबंधी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर परिचारिकांनी आपला संप मागे घेत कामावर रुजू होण्याचे आश्वासन दिले आहे.
@@AUTHORINFO_V1@@