मतदारांसाठी तेरा पुराव्यांपैकी एक पुरावा ग्राह्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |



 

पालघर : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दि. २५ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. सदर निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना दिलेले फोटो ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन यावे. जे मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांनी खालील नमूद केलल्या कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा घेऊन येणे आवश्यक आहे.
 

पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पदवी/पदविका प्रमाणपत्र (Degree/Diploma Certificate), राज्य/केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपनी यांच्यामार्फत त्यांचे कर्मचाऱ्यांना दिले गेलेले फोटो ओळखपत्र, बँक/पोस्ट ऑफिस यांच्याकडील फोटोसह पासबुक (दि. ३१ मे पूर्वी उघडलेले), स्थावर मालमत्ता कागदपत्रे, ज्यामध्ये संबंधितांचे छायाचित्र आहे, असे दि. ३१ मे पूर्वी निर्गमित केलेले फोटोसह रेशनकार्ड, सक्षम अधिकाऱ्यामार्फत दि. ३१ मे पूर्वी निर्गमित कलेले फोटो असलेले SC/ST/OBC जात प्रमाणपत्र, छायाचित्रासह शस्त्र परवाना, सक्षम प्राधिकरी यांच्यामार्फत दि. ३१ मे पूर्वी छायाचित्रासह निर्गमित केलेले अपंग प्रमाणपत्र, आधारकार्ड, आरजीआय/ एनपीआर यांच्यामार्फत दिलेले स्मार्टकार्ड तरी नमूद केलेल्या कागदपत्रांच्या आधारे दि. २५ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्व पदवीधर मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी, कोकण पदवीधर मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त कोकण विभाग, डॉ. जगदीश पाटील व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

 

तक्रार निवारण कक्ष स्थापन

 

भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम दि. २४ मे रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये घोषित केला आहे. त्यानुसार दि. २५ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणूककामी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२५२५-२५०८०८ हा आहे. या निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास या दूरध्वनी क्रमांकावर तत्काळ संपर्क करावाअसे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@