सकाळी फिरायला गेलेल्या वृध्दास लुटले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |

२ हजारांची रोकड व चारचाकी लंपास

 
 
जळगाव, १८ जून :
सकाळी मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका ५९ वर्षीय इसमास मित्र पुढे निघून जाणे महागात पडले असून अज्ञात चोरट्याने त्यांच्याकडील २ हजार रू. व चारचाकी लांबवली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
शहरातील आदर्शनगरमधील रहिवासी नरेंद्र ठाकूर यांचा उषा ट्रान्सपोर्ट या नावाने व्यवसाय आहे. नरेंद्र ठाकूर नेहमीप्रमाणे सुभाष तोतला व जगन्नाथ काटू महाजन यांच्यासोबत सोमवारी सकाळी ६ वा. त्यांची चारचाकी क्र. एमएच १९ बी.यु. ३७६५ घेवून मेहरुण तलावाजवळ फिरायला गेले होते. त्यांनी गाडी तेथे पार्क केली. दरम्यान, त्यांच्यासोबतचे मित्र पुढे निघून गेल्याची संधी साधत तोंडावर रुमाल बांधून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी ठाकूर यांच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारला आणि डोक्यावर पिस्तुलाचा दणका देवून त्यांच्या खिशातील रोख २ हजार रुपये आणि चारचाकीची चाबी घेऊन चारचाकीसह पोबारा केला.
 
 
ठाकूर या हल्ल्यात जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@