शासकीय योजना युवकांपर्यंत पोहोचवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |




पनवेल : शासनाच्या युवकांसाठी अनेक योजना आहेत, मात्र त्या माहीत नसल्याने युवक त्याचा लाभ घेत नाहीत. या योजना युवकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी केले. ते कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप-रिपाइं युतीचे उमेदवार अॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल येथे आयोजित बैठकीत बोलत होते.

 

नवीन पनवेल सेक्टर २ येथील कर्नाटक संघ हॉलमध्ये झालेल्या या बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, उमेदवार अॅड. निरंजन डावखरे, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर चारुशीला घरत, सभापती प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, नगरसेवक संतोष शेट्टी, विक्रांत पाटील, नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, सुशीला घरत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘माझा संकल्प’ या अॅड. निरंजन डावखरे यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. चंद्रकांतदादा पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ”शासनाच्या युवकांसाठी अनेक योजना आहेेत, मात्र त्या माहीत नसल्याने त्याचा युवक लाभ घेत नाहीत.” अण्णासाहेब पाटील स्वयंरोजगार योजनेमध्ये युवकांना बँकेकडून बिनव्याजी १० लाख रुपये कर्ज मिळते. त्याचा व्याज शासन भरते.

 

बहुजन समाजातील ज्या पालकांचे उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना मेडिकल व इंजिनियरिंगसह ६०५ अभ्यासक्रमांची ५० टक्के फी शासन भरते. ही सारी माहिती शिक्षकांनी मुलांना द्यावी. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप-रिपाइं युतीचे उमेदवार अॅड. निरंजन डावखरे तरुण, तडफदार आहेत. त्यांनी चांगली कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना विजयी करा, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.

@@AUTHORINFO_V1@@